जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जिंकली “प्रथम क्रमांकाची बक्षिसे”
जळगाव, ता. ९ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी
पब्लिक स्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यानी जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय जळगाव, स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक व पोलीस जलतरण तलाव जळगांव
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत “सर्वसाधारण
विजेतेपद” मिळवत प्रथम क्रमाकाचे यश संपादन केले. यावेळी या स्पर्धेत जी. एच.
रायसोनी पब्लिक स्कूलच्या २४ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा ५ व
६ ऑक्टोबर दरम्यान पोलीस जलतरण तलाव जळगांव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या
स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते विजयी ठरलेल्या
विध्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा
क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सौ. सुजाता गुलाने व पोलीस जलतरण तलावाचे प्रशिक्षक कमलेश नगरकर हे
उपस्थित होते. या अनुशंगाने विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे
संचालक श्री. सुनील रायसोनी व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका
तेजल ओझा यांनी अभिनंदन केले. तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे या विध्यार्थ्याना मार्गदर्शन
लाभले.
स्पर्धेतील विजेते
१४ वर्षाखालील मुले
यश अमित हेमनानि, आरुष अभय चौधरी, क्रितांश कल्पेश सुराणा, रुद्र अमित मतानी, कलश कौशल मुंदडा, लव विक्रम हसवाणी, खुश विक्रम हसवाणी, इद्रीप युसुफ चष्मेवाला
१४ वर्षाखालील मुली
मृण्मयी मिलिंद थत्ते, फातेमा युसुफ चष्मेवाला, संजय कोर जस्मित छाबडा, पेहल धर्मेश गादिया, तसलीम झुंजर बदामी.
१७ वर्षाखालील मुले
संयम मनोहर लुंकड, श्लोक महाजन, ऋत्विक प्रशांत अग्रवाल, स्मित आनंद सावना, गुरमीत अनुप तेजवानी, देशराज कीर्ती मुनोद, मुर्तजा युसुफ बारमल, अभिषेक प्रदीप तेजवानी
१७ वर्षाखालील मुली
ऋतुजा हर्षल भंडारी, तिया भावेश देसाई, अनया मितेश पलोड
.jpeg)
Comments
Post a Comment