निर्णय प्रक्रियेत "डाटा अ‍ॅनालिटिक्स"ची भूमिका महत्त्वाची : निकिता गौर

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात डाटा अ‍ॅनालिटिक्स फॉर बिजनेस डिसिजन मेकिंगया विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगाव, ता. ७ : निर्णय प्रक्रियेत डाटा अॅनालिटिक्सची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात या प्रक्रियेला जास्त महत्त्व आले आहे. माहिती व तंत्रज्ञान, सांख्यिकीय विश्लेषण आणि संगणकावर आधारित मॉडेलयांना एका सूत्रात जोडून या प्रक्रियेत निर्णय घेता येतो असे मत नागपूरच्या डाटा अॅनालिटिक्स तज्ञ निकिता गौर यांनी व्यक्त केले. डाटा अॅनालिटिक्स फॉर बिजनेस डिसिजन मेकिंगया विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातर्फे विशेष पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावतरिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यशाळेची प्रस्तावना मांडताना नमूद केले कि, जगातील बहुतेक माणसे आणि उद्योगसुद्धा निर्णय घेतेवेळी फक्त पूर्वानुभव, अंदाज आणि आतला आवाजकिंवा अंत:स्फूर्ती यांचा वापर करतात. साहजिकच ते कधी कधी नशीबवान ठरतात, तर बरेचदा चूक ! त्याऐवजी डेटा अ‍ॅनालिटिक्सचा वापर केला, तर चुका कमी होऊ शकतात अन याच बाबीचा मागोवा घेत आम्ही डेटा अ‍ॅनालिटिक्स या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले असून या कार्यशाळेत विध्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन मिळणार आहे असे त्यांनी नमूद केले. यानंतर निकिता गौर यांनी डेटासेंट्रिक डिसिजन मेकिंग’, डिस्क्रिप्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स, प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स, प्रिस्क्रिप्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स यांचे महत्त्व सांगत विध्यार्थ्यानी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन केले. या कार्यशाळेत बिग डेटा व सुपर कम्प्युटिंग संदर्भात देखील माहिती देण्यात आली. केस स्टडीच्या माध्यमातून देखील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. सदर कार्यशाळेचे समन्वयक प्रा.रोहित साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. मुकेश अहिरराव, प्रा. जितेंद्र जमादार यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले तसेच प्रा.तन्मय भाले यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश