विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढविण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

प्रा. अंजली बियानी यांनी केले रिझ्युम, इंटरव्यू व ग्रुप डिस्कशनवर सखोल मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग 

जळगाव, ता. १९ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विभागाच्या अंतर्गत ‘एप्टीट्यूड, रिझ्युम बिल्डींग, ग्रुप डिस्कशन, मॉक इंटरव्यू व त्याचे प्रिपरेशन‘ या विविध विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. बीसीए आणि एमसीएच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेची सुरुवात करतांना प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते. करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना होईल. 'मुलाखत तंत्र आणि मंत्र, रिझ्युम व ग्रुप डिस्कशन या विषयांवर करिअर समुपदेशक प्रा. अंजली बियाणी हे उपस्थित विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील प्रश्न नक्की सोडवतील असा आशावाद त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत व्यक्त करत महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यानंतर कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या प्रा. अंजली बियाणी यांनी पहिल्या सत्रात मुलाखत तंत्राच्या विविध बाबीची माहिती देतांना मुलाखतीसाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान, गणवेशाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक पात्रता, सामान्य ज्ञान, बोलण्याची कला, पूर्वतयारी, मुलाखती दरम्यानचे वक्तृत्व, देहबोली आदीबाबत मार्गदर्शन केले यानंतर दुसऱ्या सत्रात रिझ्युमवर मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले कि, नोकरीसाठी रिझ्युम तयार करताना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. रिझ्युम  हा जणू तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. उत्तम रिझ्युम समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडून जाण्यासाठी मोठी मदत करतो. रिझ्युम जर प्रभावशाली नसेल किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुरेशी माहिती देणारा नसेल, तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमी होते. कदाचित तुमची शैक्षणिक पात्रता व कामाचा अनुभव हा त्या पदासाठी योग्य असेल. परंतु रिझ्युम चांगला नसल्यामुळे तुम्ही संधी गमावूही शकता म्हणून रिझ्युम तयार करताना बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ग्रुप डिस्कशनवर मार्गदर्शन करतांना सांगितले कि, ग्रुप डिस्कशनचा विषय जाहीर झाल्यावर नीट ऐका आणि समजून घ्या. तुम्हाला ज्या मुद्द्यावर जोर द्यायचा आहे त्याची यादी बनवा व  जर तुम्हाला विषयाबद्दल ज्ञान असेल आणि पुरेसे मुद्दे असतील तर तुम्ही ग्रुप डिस्कशनच्या मूलभूत गोष्टी सुरू करू शकता. 3-4 वेळा 25-30 सेकंदांचे छोटे वाक्य बोला आणि आपले मुद्दे मांडा. अतिशयोक्ती करू नका, इतरांनाही बोलण्याची संधी द्या. प्रत्येक सदस्याच्या योगदानाचा आदर करा आणि तुम्ही बोलण्याची योग्य वेळ ओळखा. जर तुम्ही एखाद्या मुद्द्याशी सहमत नसाल तर विनम्रपणे असहमत व्हा कारण ती चर्चा आहे वाद नाही. बोलण्याचा प्रयत्न करा आणि चांगली छाप पाडा, तुमचं ग्रुप डिस्कशन स्किल्स सर्वांना दाखवा. तुम्ही एखाद्या मुद्द्यावर चर्चा करत असताना ग्रुप सदस्यांवर लक्ष ठेवा आणि त्यांच्याकडेच बघून बोला. तुमचे कपडे हे नेहमी फॉर्मल आणि लाईट रंगाचे असू द्या असे विविध मुद्धे त्यांनी विषद केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एमसीए विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा.रुपाली ढाके, प्रा.विनोद महाजन, प्रा.करिष्मा चौधरी, प्रा.हर्षिता तलरेजा, प्रा.ऐश्वर्या परदेशी, प्रा.मनीषा राजपूत, प्रा.कविता भंगाळे, प्रा.वर्षा सुरळकर, प्रा.मानसी तळेले यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश