राज्यस्तरीय नासिक प्रिमिअर लीग टेबल टेनिस स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल “अव्वल”
इयत्ता पाचवीतील समन्यू जैनचा प्रथम क्रमांक ; सर्वत्र कौतुक
जळगाव, ता. १२ : शालेय स्तरावर
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी असते आणि खरे पाहता
शालेय जीवनात मुलांमधील कलागुणांना अधिक वाव मिळतो. विविध स्पर्धांमध्ये सहभागी
होत मुलांमधील सुप्त गुणांना सर्वांसमोर मांडण्याची एक संधी दिली जाते. त्यातूनच
त्या विद्यार्थ्यांमधील एक कलाकार, खेळाडू
घडत असतो. अशाचप्रकारे राज्यस्तरीय नासिक प्रिमिअर लीग टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आली.
विविध वयोगटांमध्ये या स्पर्धेची चुरस चांगलीच रंगली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील
सुमारे ५० शाळांचा सहभाग होता. तर या स्पर्धेत जळगावच्या एका शाळेने विजयी पताका
रोवली.
या राज्यस्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस
स्पर्धेत जळगावच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने बाजी मारली. या स्कूलकडून
सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये इयत्ता पाचवीतील समन्यू जैन या स्पर्धकांने प्रथम
क्रमांक पटकावत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे नाव उज्ज्वल केले. या अनुशंगाने
विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री.
सुनीलजी रायसोनी व जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले. तर क्रीडाशिक्षक संजय
चव्हाण यांचे या विध्यार्थ्याला मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment