“जी. एच. रायसोनी टोडलर टेल्स” मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

“जी. एच. रायसोनी टोडलर टेल्स” मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा जळगाव , ता. ३१ : सावखेडा येथील ' जी. एच. रायसोनी टोडलर टेल्स ' मध्ये प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्याध्यापिका तेजल ओझा यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हा कार्यक्रम राबविण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘ रक्षाबंधन ’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. याच बाबीचा मागोवा घेत सावखेडा येथील ' जी. एच. रायसोनी टोडलर टेल्स ' मध्ये रक्षाबंधन दिनाचं औचित्य साधत हा दिवस खास जपण्यासाठी , व त्यामधील जिव्हाळा टिकवण्यासाठी आणि बहिण भावाचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी येथे रक्षाबंधन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून यावेळी नृत्य , गायन व रॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यात आले. रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधत चॉकलेट व बिस्कीट देऊन मैत्रीचे नाते अधिक घट्ट केले.