जी. एच. रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला खेळाडूंच्या सन्मानार्थ “म्युझिकल फ्लॅश मॉब”चे आयोजन
विध्यार्थ्यांच्या अचानक नृत्याविष्काराने महाविद्यालयातील अनेक कर्मचारी - विध्यार्थी सरप्राईज ; “चक दे इंडिया”वर दिला दमदार परफॉर्मन्स
जळगाव, ता. २८ : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती असलेल्या २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने या दिनाचे औचित्य साधून ता. २८ ऑगस्ट सोमवार रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ८५ पेक्षा जास्त विध्यार्थ्यानी खेळाडूंच्या सन्मानार्थ ‘बियॉंड द बाउंड्रीज – स्पोर्ट वारीयर्स ’ या विषयावर आधारित एक म्युझिकल फ्लॅश मॉब सादर केला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तब्बल १५ मिनिटे सादर केलेल्या या कार्यक्रमात विविध क्रीडा गीतांवर नृत्ये प्रस्तुत करण्यात आली. यावेळी महाविद्यालयात आलेल्या विध्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हा कार्यक्रम बघितला व टाळ्यांचा वर्षाव करत वातावरणातील उत्साह वाढवला. आपल्या देशाचे नाव उंचवनाऱ्या खेळाडूविषयीचे प्रेम व अभिमान सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसून येत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील खेळाडूंची महानता आणि समृद्ध वारसा याविषयी माहिती देत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सर्वांच्या मनाला भिडणाऱ्या ‘जय हिंद’ या जयघोषाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी
या उपक्रमात उपस्थित जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांनी विध्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व भालाफेकपटू नीरज
चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
तसेच उपस्थित विध्यार्थ्यांना नीरज चोप्राच्या या सुवर्ण कामगिरीचा आदर्श घ्यावा असे
आवाहन केले.तसेच म्युझिकल फ्लॅश मॉबमध्ये विवेक पाटील, गणेश पाटील, पियुष तडे, अनिकेत
पाटील, सुनयना बालोद, अदिती वाणी, भूमी दर्डा, सरस्वती साहित्य या विध्यार्थ्यानी
सहभाग नोंदविला तर या उपक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले
तसेच डॉली मंधान, प्राची जगवाणी यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे
संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय
शेखावत यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment