कुठलाही व्यवसाय छोटा नसतो. जिद्दीने आणि कल्पकतेने तो मोठा करता येतो : भरत ओसवाल
जी. एच. रायसोनी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कील एज्युकेशन ; जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनसोबत करार
जळगाव, ता. २४ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच नवीन कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा प्रमुख उद्देश समोर ठेवून ता. २४ गुरुवार रोजी “जर्नी ऑफ इनोवेशन स्टार्टअप अँड इंटरप्रनर्शिप” या पाच दिवसीय महाविद्यालयात सुरु असलेल्या कार्यशाळेत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) सोबत करार करण्यात आला. हा करार जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व जितो इंटरनॅशनल इनक्युबेशन फाउंडेशनचे गव्हर्नर श्री. भरत ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थित व स्वाक्षरीने करारावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जितो जळगाव चॅप्टरचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, जीतो जळगाव युवा शाखा अध्यक्ष हरक सोनी, निखिल कोठारी व जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिलतर्फे या आठवड्यात (२३ ते २८ ऑगस्ट) दरम्यान “जर्नी ऑफ इनोवेशन स्टार्टअप अँड इंटरप्रनर्शिप” वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या कार्यशाळेत उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे घेण्याचे ठरल्याने याच अनुषंगाने रायसोनी महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने विचारमंथन करण्यासाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट व्यवस्थापन तज्ञ, विध्यार्थी व उद्योजक यांना एकत्र आणणे हे आहे, जे विविध ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि कार्यशाळेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करतात. ही कार्यशाळा तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणर क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरेल तसेच भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत असून नुकतेच चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तसेच जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन हि संस्था उद्योगांसाठी समर्पित असे कार्य करीत असून आमच्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना जितो च्या माध्यमाने नवीन कौशल्य आधारित शिक्षण मिळून त्यांच्या विविध संकल्पना विध्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकूण १८० कॉपीराइट्स, ३५ पेटंट व ४० पेपर दाखल केल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले.
यांनतर कार्यशाळेचे प्रमुख वक्ते जितो इंटरनॅशनल इनक्युबेशन फाउंडेशनचे गव्हर्नर श्री. भरत ओसवाल यांनी यशाला कुठलाही 'शॉर्टकट' नसतो, आणि कष्टाला कोणताही पर्याय नसतो. व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल, तर ध्येय निश्चित करून त्या दिशेने अविश्रांत वाटचाल आवश्यक आहे. अडथळे, अडचणी येतातच, त्यावर मात करणे हीच उद्योजकाची खरी कसोटी आहे. तडजोडीची वेळ आल्यास आपला आत्मसन्मान आणि तत्व न सोडता तडजोड करावी. नफ्याची शिखरे गाठताना सामाजिक बांधिलकही विसरू नये व कुठल्याही कामात समन्वय, संवाद आणि सहकार्य याचा उपयोग करून घ्यावा लागतो तसेच कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो. जिद्दीने आणि कल्पकतेने तो मोठा करता येतो असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर समन्वय इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिलच्या विभागप्रमुख प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी साधले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. तन्मय भाले, रोहित साळुंखे व आदीनी परिश्रम घेतले तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत असल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment