राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सन्मान
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांची उपस्थिती ; मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा
जळगाव, ता. २९ : मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे जागतिक खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांनी सांगितले.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी. एच.
रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाविद्यालयातील
क्रीडापटूंचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत
होते. यावेळी सुरवातीस त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले.
व्यासपीठावर जी. एच. रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन
प्रा. तन्मय भाले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना
रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, क्रीडा क्षेत्रामध्ये फक्त एक उत्कृष्ट
खेळाडू, उत्कृष्ट प्रशिक्षक व एखादा शिक्षक एवढ्या मर्यादित करिअरच्या संधी नसून
या पलीकडे स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स
जर्नालिझम, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट मॅनेजमेंट, स्पोर्ट अॅडमिनिस्ट्रेटर, जिम इंस्ट्रक्टर व ॲथलीट मॅनेजर यासह
अनेक संधी क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे आहेत. जागतिकीकरणाच्या युगात
उद्योग क्षेत्रात क्रीडा क्षेत्राने भरारी घेतली आहे. तसेच महिला खेळाडूंना आज
पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून दिली जात असून शासनाच्या व सामाजिक
संस्थांच्या पुढाकारामुळे महिला खेळाडूंचा सहभाग अलिकडच्या काळात वाढतांना दिसून
येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका
घाटे व अक्षया दानी या विध्यार्थिनीनी केले तर
समन्वय क्रीडा विभागाचे प्रमुख जयंत जाधव यांनी साधले तसेच क्रीडा विभागाचे राहुल
धूळनकर व ममता प्रजापत यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या
आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी
कौतुक केले.
या खेळाडूंचा झाला सत्कार
नचिकेत नरेंद्र ठाकूर (क्रिकेट), योगेश
मनोहर साळुंखे (सॉफ्टबॉल),गोरव रामशिंग सोनवणे (बेसबॉल),आदित्य प्रभाकर पाटील (बेसबॉल),पंकज
नारायण पाटील (फुटबॉल),सागर किशोर चौधरी (मल्लखांब), धनश्री राजीव जाधव (स्विमिंग),गौरी
अजय चौधरी (क्रिकेट), योगेश मनोहर साळुंखे (बेसबॉल), आशिष बिबिसन गावित (फुटबॉल), रुची
शरद भाटिया (सॉफ्टबॉल), कांचन शर्मा (बुद्धिबळ), भरत दिलीप चौधरी (स्विमिंग), अनिकेत
नितीन चौधरी (तलवारबाजी), देवयानी सुभाष चौधरी (मल्लखांब),यशराज विद्याधर सोनवणे (बेसबॉल),
निखिल गोविंद मिस्त्री (मिनी गोल्फ), राजरत्न मिलिंदकुमार गधे (रायफेल शूटिंग), जागृती
हटकर (बास्केटबॉल), खुशबू हटकर (बास्केटबॉल),
Comments
Post a Comment