जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘सायबर फॉरेन्सिक प्रॅक्टिसेस‘वर कार्यशाळा

पाच दिवसीय कार्यशाळेत आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

जळगाव, ता. २०  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत सायबर फॉरेन्सिक प्रॅक्टिसेसया विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा सुरु आहे. या कार्यशाळेत सायबर फॉरेन्सिक म्हणजे काय, सायबर क्रिमिनल कशाप्रकारे सायबर हॅक्सचा वापर करून आपली माहिती हॅक करू शकतात असे विविध मुद्दे सायबर संस्कारचे कार्यकारी संचालक डॉ. तन्मय दीक्षित यांनी सोदाहरण देत कार्यशाळेत सहभागी विध्यार्थ्यांना विशद केले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी काही विध्यार्थ्यानी विविध नामांकित कंपनीच्या वेबसाईटमधील त्रुटी शोधून काढत त्या संदर्भात रिपोर्ट तयार करून तो सादर केला. तसेच इमेल स्पूफिंग, वेबसाईट हॅकिंग या विषयावर प्रात्याक्षिक देत त्या संदर्भात सखोल माहिती दिली. यानंतर गांधीनगर येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे संचालक प्रा. डॉ. एस. ओ. जुनारे व प्रा. मुक्ती पाध्या यांनी सायबरचे कायदे कोणते व कसे, युवक-युवतींनी इंटरनेट हाताळताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी, कोणकोणत्या वेबसाईट अधिक संवेदनशील आहे अश्या विविध विषयांवर या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व प्रा. प्रमोद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली तर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. निलेश इंगळे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. तुषार वाघ, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. पूजा नवाल, प्रा. योगिता धांडे, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. रश्मी झांबरे यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश