जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात निसर्ग फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

विद्यार्थ्यांनी टिपले महाविद्यालय परिसरातील निसर्ग सौंदर्य” ; विध्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहाने सहभाग

जळगाव, ता. १९ : एक लोकप्रिय म्हण आहे एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असतेही म्हण जागतिक फोटोग्राफी दिनामागील मूळ कल्पना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकते. हा दिवस दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. फोटोग्राफी उत्साही जगभरातून एकत्र येऊन फोटो काढण्याची कला साजरी करतात. फोटोग्राफीच्या विज्ञानाने संपूर्ण मानवी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्याकडे ऐतिहासिक क्षणांच्या नोंदी आहेत कारण ते छायाचित्रांमध्ये टिपले गेले आहेत आणि ते कायमचे पाहिले जाऊ शकतात. फोटोग्राफी अभिव्यक्ती, भावना, कल्पना आणि क्षण ताबडतोब कॅप्चर करू शकते आणि भावी पिढ्यांसाठी साठवून ठेवता येऊ शकते. या अनुषंगाने व या दिनाच्या ओचीत्याने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शनिवार ता. १९ रोजी जागतिक फोटोग्राफी डे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्राफिक्स व फोटोग्राफी विभागातील सर्व कॅमेरांचे पुजन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निसर्ग फोटोग्राफी स्पर्धेतील सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी फोटोग्राफी ही एक जादू आहे जी मौल्यवान क्षण कॅप्चर करते, ज्यामुळे आपण ते मौल्यवान क्षण नेहमी लक्षात ठेवू शकतो आणि ते पाहण्याचा आनंद घेऊ शकतो. 25-30 वर्षापूर्वी अनेक लोकांकडे कॅमेरा देखील नव्हता, जेणेकरून ते त्यांचे फोटो काढू शकतील आणि ते संस्मरणीय म्हणून ठेवू शकतील, परंतु आज जवळजवळ प्रत्येकाकडे मोबाईलच्या रूपात कॅमेरा आहे. ज्या मुळे आपण कधीही आणि कुठे ही फोटो काढू शकता असे नमूद करत त्यांनी यावेळी फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या सर्वाना जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. यावेळी महाविद्यालयातील सर्व विध्यार्थ्यांसाठी निसर्ग फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिरसोली रस्त्यावरील निसर्गाने नटलेल्या अश्या जी. एच. रायसोनी महाविद्यालय परिसरातील विविध स्पॉटवरील निसर्ग सौंदर्यआपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तसेच सदर स्पर्धेचे परीक्षण करून या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रा. सुवर्णा सराफ, प्रा. स्वाती बाविस्कर व प्रा. श्रीराम अग्रवाल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश