“कल्पकता” युवक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग - प्रा. डॉ. मनिष जोशी
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ‘पिनॅकल’ महोत्सवाचे दोन दिवसीय भव्य आयोजन जळगाव : कल्पकता युवक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग असतो तसेच आजच्या युवकांनी प्रॉब्लेम सोल्वर, इंटर डीसीप्लनरी होऊन त्यांनी स्वताची व्हॅल्यू वाढवायला हवी तसेच ‘ अपयश हीच यशाची पहिली पायरी मानावी. अपयशाने खचून न जाता आपण पुन्हा प्रयत्न केल्यास पहिल्यापेक्षा जास्त किंबहुना अधिक असे उज्ज्वल यश मिळेल ; असा आशावाद ठेवावा. कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास कोणतेही काम यशस्वी होते असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्यूटर सायन्सचे विभागप्रमुख प्रा.डॉ. मनीष जोशी यांनी व्यक्त केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात दोन दिवसीय सुरु असलेल्या माहिती , तंत्रज्ञान , संगणक व विज्ञानाशी निगडीत आंतरराष्ट्रीय “पिनॅकल-२०२२ ” या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग...