जी. एच. रायसोनी वंडर किड्समध्ये इंग्रजी कविता पठण स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव, ता. ३० : येथील जी. एच. रायसोनी वंडर किड्समध्ये प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरवर्ग इंग्रजी कविता पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या लहानग्याची स्टेजवरील भीती दूर करण्यासाठी  तसेच मुलांचे मन, त्यांची स्व-अभिव्यक्ती, उच्चारण कौशल्ये तसेच आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने हि इंग्रजी कविता पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या चिमुकल्यांनी जॉनी जॉनी, ट्वीकंल ट्वीकंल, डायमंड इन द स्काय इत्यादी पाठ्यपुस्तकातील विविध थीमवर आपल्या कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध करत त्यांच्या व्हॉईस मॉड्युलेशन आणि अप्रतिम लक्षात ठेवण्याच्या कौशल्याने सर्वांना चकित केले.  या छोटय़ा गायकांना उपस्थित शिक्षकांनी भरभरून दाद दिली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका नेहा शिंपी, तस्नीम टंकरवाला, निकिता जोशी, नेहा चिंचोले, मयुरी वालेचा, आरती पाटील, निधी खडके, रिंकू लुल्ला, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश