जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा

पथनाट्यातून सांगितले हिंदी भाषेचे महत्व ; ; विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. १४ : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. या अनुषंगाने ता. १४ सप्टेंबर  रोजी जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या  प्रा. सोनल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हिंदी दिनउत्साहात साजरा  करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नंदिनी पाटील या विद्यार्थिनीने स्वागतगीताने केल्यानंतर हिंदी विभागप्रमुख प्रा.मीनाक्षी पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. तसेच कार्यक्रमात अकरावी-बारावी वर्गाच्या विध्यार्थ्यानी हिंदी भाषेचे महत्व सांगणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण केले. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी सर्वाना हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत हिंदीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिंदी भाषेचे महत्व सांगणाऱ्या पथनाट्याचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या भविष्यात या मुलांचे विचारच भारताला सक्षम बनवतील. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रा. मिनाक्षी पाटील यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेशी निगडित विविध बौद्धिक खेळ खेळविले.यावेळी महाविद्यालयातील वातावरण पूर्णपणे हिंदीमय झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पाटील या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमासाठी प्रा. संदीप पाटील, प्रा. शीतल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियंका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. मुकेश सदानशिव, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी, प्रा.निकिता वालेचा व इतर शिक्षकेतर कर्मचारी अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश