युवकांनो उद्योग क्षेत्राकडे वळा, शासन तुमच्या पाठीशी : श्री रुपेश पाटील

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात उद्योजकता आणि शासनाच्या विविध योजनाया विषयावर कार्यशाळा : विध्यार्थ्याचा मोठ्याप्रमाणात सहभाग


जळगाव,ता. १६ : तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे. तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस करुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन नवउद्योजकांना प्रशासनाच्यावतीने कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक श्री. रुपेश पाटील यांनी व्यक्त केला.

उद्योग व व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनाची ओळख करुन देण्यासाठी व विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती तसेच त्याचा लाभ व्यापक स्वरुपात देण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या विशेष संकल्पनेतून जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला., याप्रसंगी ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात निरीक्षक श्री. रुपेश पाटील पुढे म्हणाले कि, तरुणांनी नाविन्यपूर्ण विचार करुन व्यवसाय करण्याचे धाडस दाखवावे. उद्योगाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातील तरुणाला उद्योगाची संधी निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही, अशी खात्री रुपेश पाटील यांनी उपस्थितांना देत शासनाच्या विविध योजनाची माहिती यावेळी दिली. सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. एम. डी. जाखेटे यांनी केले तर प्रा. सौरभ नाईक, प्रा. अमोल जोशी, प्रा.भाग्यश्री पाटील व प्रा. शुभम घोष यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश