जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित दोन दिवसीय “एआय” आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
परिषदेत आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा सखोल अभ्यास; विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक मोठ्या संख्येने सहभागी
जळगाव, ता. २६ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो.एआय, इंडेस व स्पारफीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने ता. २३ व २४ सप्टेंबर रोजी “एआय इंटरनॅशनल समिट २०२२” या शीर्षकाखाली दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या विषयावर विचार मंथन झाले. परिषदेतील पहिल्या उद्घाटकीय सत्रात व बीजभाषक म्हणून मल्टिप्लाय वेंचरचे सहसंस्थापक भूषण पाटील यांनी “एआय न्यू रिटेल मार्केटिंग” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच परिषदेच्या दुसऱ्या सत्रात “कॉम्प्युटर विजन इन एआय व प्रॅक्टिकल स्वरम इन इंटेलिजन्स इन एआय” या विषयावर प्रख्यात मावेनीर सिस्टीमचे वरिष्ठ सदस्य दीपक प्रधान, आयआयआयटी पुणे येथील प्रा. डॉ. अमृता लिपारे व सुरत येथील एसव्हीएनआयटीचे प्रा. डॉ. प्रशांत शहा यांनी मार्गदर्शन केले. यानंतर परिषदेत स्पार्टीफिशियल इनोवेशनचे ट्रेनर सुधीर साजन, इंडिज सोल्युशनचे संचालक अभीज्ञानम गिरी, इंडेज सोल्युशनचे सॉफ्टवेअर डिझाईन अभियंता रोहित कुकरेजा, भारतसाॅफ्ट सोल्युशनचे संचालक योगेश मुरूमकर, मुंबईतील व्हीजेटीआयचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप एस. उदमले व आदि क्षेत्रातील मार्गदर्शकानी या दोन दिवसीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी विविध राज्यामधून अनेक प्राध्यापक व विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स समोरील वर्तमान आव्हाने आणि प्रश्नांच्या संदर्भात या परिषदेत विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकानी सखोल अभ्यास केला. दोन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ मुंबई व्हीजेटीआय येथील प्रा. संदीप उदमले, जबलपूर आयआयटीडीएम येथील प्रा. अमृता भट्टाचार्य, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा या मान्यवरांच्या उपस्थितीत रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात संपन्न झाला. दरम्यान, प्रा. संदीप उदमले यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद कि, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्व प्रक्रियेच्या सक्रिय विश्लेषणाद्वारे आणि मॅन्युफॅक्चरिंग लाइनमधून येणाऱ्या गुणवत्ता डेटाद्वारे ऑपरेटरला वाढवून उत्पादन उद्योगात परिवर्तन करत आहे. तसेच उत्पादन उद्योगात बदल घडवत आहे. AI रीअल-टाइम उपकरणे देखभालीपासून ते व्हर्च्युअल डिझाइनपर्यंत उत्पादन प्रक्रियेतील संभाव्य ऍप्लिकेशन्सपर्यंत पोहोचू शकते जे नवीन, सुधारित आणि सानुकूलित उत्पादनांना स्मार्ट सप्लाय चेन आणि नवीन व्यवसाय मॉडेल्सच्या निर्मितीसाठी परवानगी देत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रा. अमृता भट्टाचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, आज जवळजवळ प्रत्येक उद्योग यशस्वीरीत्या चालवण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनावर उद्योग अवलंबून आहे, त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिझाइन थिंकिंग हि कौशल्ये व्यवसायांना स्मार्ट, जलद निर्णय आणि उत्पादने घेण्यास अधिकाधिक मदत करीत आहे. ही कौशल्ये क्षेत्र-विशिष्ट नाहीत आणि उत्पादन, आरोग्यसेवा, वित्त, IT, प्रवास, शिक्षण आणि अगदी तेल व वायू यासह विविध व्यवसायांसाठी लागू आहेत असेहि त्यांनी यावेळी सांगितले. सत्राच्या शेवटी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक व रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी चर्चेचा समारोप केला. ज्यामध्ये, विविध विषय हाताळत संशोधनात उद्योन्मुख “एआय”च्या वापरासंदर्भात सहभागींना प्रबोधन केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. स्वाती पाटील व प्रा. प्रमोद गोसावी यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील तसेच संस्थेतील इतर प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment