“कल्पकता” युवक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग - प्रा. डॉ. मनिष जोशी
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ‘पिनॅकल’ महोत्सवाचे दोन दिवसीय भव्य आयोजन
जळगाव : कल्पकता युवक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग असतो तसेच आजच्या युवकांनी प्रॉब्लेम सोल्वर, इंटर डीसीप्लनरी होऊन त्यांनी स्वताची व्हॅल्यू वाढवायला हवी तसेच ‘अपयश हीच यशाची पहिली पायरी मानावी. अपयशाने खचून न जाता आपण पुन्हा प्रयत्न केल्यास पहिल्यापेक्षा जास्त किंबहुना अधिक असे उज्ज्वल यश मिळेल; असा आशावाद ठेवावा. कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास कोणतेही काम यशस्वी होते असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्यूटर सायन्सचे विभागप्रमुख प्रा.डॉ. मनीष जोशी यांनी व्यक्त केले.
येथील जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात
दोन दिवसीय सुरु असलेल्या माहिती, तंत्रज्ञान, संगणक व विज्ञानाशी निगडीत आंतरराष्ट्रीय “पिनॅकल-२०२२” या स्पर्धेच्या
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायसोनी
इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, चाळीसगाव
येथील बी.पी.आर्ट्स महाविद्यालयातील कॉम्प्युटर मॅनेजमेंटचे विभागप्रमुख राहुल
कुलकर्णी, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, पिनॅकल समन्वयक व एमसीए विभागप्रमुख
प्रा.रफिक शेख तसेच बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे उपस्थित होते. सदर उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी ‘पिनॅकल’ स्पर्धेत
सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत आयोजन
कार्यक्रमातील सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक व विध्यार्थ्याचे
कौतुक केले तसेच प्रायोगिक
स्तरावरील संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. आजच्या
विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते संशोधन न करता नवनिर्मिती करण्यासाठी सतत प्रयत्न
करत राहिले पाहिजे. तसेच मेक इन इंडियासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सतत
इनोव्हेटिव्ह कार्य केले पाहिजे असे आवाहन संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी येथे केले.
दोन दिवसीय सुरु असलेल्या या माहिती व तंत्रज्ञानावर आधारित पिनॅकल-२०२२ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रश्नमंजुषा, संशोधन पेपर सादरीकरण, मनोरंजन व एकाग्रता
वाढविण्यासाठी संगणक गेमिंग, पोस्टर्स प्रेझेंटेशन, सीप्लसप्लस प्रोग्रामिंग स्पर्धा पार पडल्यात. यात आयटी क्विज १२००, गेमिंग ६०, संशोधन पेपर ६०, पोस्टर्स प्रेझेंटेशन १५० व सीप्लसप्लस प्रोग्रामिंग मध्ये ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
संशोधन विषयात जीएसटी, डिजिटल इंडिया, कॅशलेस सोसायटी, जिओ प्रभाव, आयओटी या प्रमुख विषयांसह आदी विषय सादर करण्यात आलेत. या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात बाबा मोटर्सचे संचालक बाबा मलिक हे
उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सिमरन आहुजा, सानिया पिंजारी व प्रा. श्रद्धा काबरा यांनी केले तर
स्पर्धा यशस्वितेसाठी पिनॅकल समन्वयक व एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख तसेच बीसीए विभागप्रमुख प्रा.
कल्याणी नेवे, प्रा. रुपाली ढाके, प्रा. विनोद महाजन,
प्रा. करिश्मा चौधरी, प्रा. सरिता चरखा,
प्रा. केतन जटाले यांनी सहकार्य केले
असा लागला निकाल
आय टी क्विझ या स्पर्धेत
प्रथम- ललित अनिल शिनकर, सोहेब खान रौफ खान पठाण द्वितीय- नवल कुकडे, सागर शेळके तृतीय-
जयकुमार बेरा, श्रेयस महाजन एन.एफ.एस.गेमिंगमध्ये प्रथम- आदित्य लाखे, द्वितीय- अभिषेक गाडे, गौतम नायर एमएम गेमिंगमध्ये प्रथम– अश्विन पवार, द्वितीय जयदीप पाटील, तृतीय निखिल पाटील सीएस
गेमिंगमध्ये प्रथम – अरशद एस पटेल, चेतन बी डेलीवाला, सृष्टी गायकवाड, तेजस व्ही बाविस्कर द्वितीय- अहतेशाम काझी, ओम किशोर भोई, शिख सुफियान, शेख उझैर पोस्टर
प्रेझेटेशनमध्ये प्रथम- जुही साळी, द्वितीय- मो.माजिद खान, तृतीय ईशा तायडे आणि ग्रुप सी. प्लस.
प्लसमध्ये प्रथम- दीपक यादव, द्वितीय- श्रेयस महाजन, तृतीय- शुभम बडगुजर यांना
अनुक्रमे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम या
प्रमाणे परितोषिक देण्यात आले.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
हेमंत सुधाकर बोदडे – संत मुक्ताबाई महाविद्यालय,
मुक्ताईनगर
स्पर्धेत खूप काही शिकायला मिळाले.
नाविन्यता पूर्वक संकल्पना अभ्यासायला मिळाल्यात. अश्या स्पर्धामुळेच
विद्यार्थ्यांना गती मिळते. येथील व्यवस्थापन खूप चांगले होते, स्पर्धा अतिशय
नियोजनबद्ध झाली.
नवल कुकडे – धारिवाल महाविद्यालय,
जामनेर
पिनॅकल स्पर्धेमुळे आमच्या सारख्या
विध्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळते, या स्पर्धेच्या
माध्यमातून आमच्या टीमने सृजनशील व आजच्या जगाला उपयोगी पडेल असे प्रात्याक्षिक
येथे मांडले होते
मा. संपादक सो,
कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकातून उद्याच्या अंकात वृत्त प्रसिद्ध
करून सहकार्य करावे ही अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment