युवारंग महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चौफेर स्पर्धा ; प्रहसन, वादविवाद, गायन आणि लोकसंगीत यांचा बहारदार संगम
पुरग्रस्त गावातील परिस्थिती, प्रेमविवाहामुळे कुटुंबातील कलह, मुक्त संवादामुळे जीवनाचे महत्व, आताची राजकीय परिस्थिती, शासनाच्या योजना आणि बारगळलेला विकास, सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, समाज व्यवस्थेचे भिषण वास्तव आदी सामाजिक संदेश देणारे प्रयोग प्रहसन या कलाप्रकाराने सहभागी स्पर्धकांनी आजचा दिवसाची सुरूवात जल्लोषात केली. यासोबतच पाश्चिमात्य समुहगान, २१ व्या शतकातील भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे का ? या वादविवाद स्पर्धेचा विषयाने झालेली जुगलबंद आजच्या युवारंग महोत्सवाचे वैशिष्टे ठरले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात प्रहसन हा कलाप्रकार सादर करीत असताना आजच्या जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा खुप छान प्रयत्न प्रत्येक सहभागी संघाकडून होताना दिसून येत होते. एकुण २६ महाविद्यालयाच्या संघांनी यात सहभाग नोंदविला...