Posts

Showing posts from July, 2025

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये मुलींसाठी आरोग्य व जीवन कौशल्यविकास उपक्रम

Image
जळगाव , ता. ३१ शहरालगत असलेल्या सावखेडा ‎ शिवार येथील जी . एच . रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींसाठी किशोरवयीन आरोग्य व जीवन कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात आला . हा अभिनव उपक्रम मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्य ात आला. या उपक्रमाला सखी सावित्री समितीच्या पुढाकाराने मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिता बाविस्कर व डॉ. भावना चौधरी हे आरोग्य विशेषज्ञ उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दरम्यान योग्य स्वच्छता कशी पाळावी , पाळी दरम्यान येणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांशी कसा सामना करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींसाठी प्रश्नोत्तरे सत्र देखील राबविण्यात आले. मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थिनींना या विषयावर खुलेपणाने संवाद साधण्याचे आवाहन करत समाजात अजूनही असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौम्या काबरा , आशिता रायसोनी , विधी सोनी , गीत जैन या विद्यार्थिनींनी केले तर सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन ...

नवीन शैक्षणिक धोरण, नवीन वाटा, नवीन भविष्य : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा”चा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; पथनाट्य , घोषवाक्य लेखन , निबंध स्पर्धा व विविध शाळामध्ये एनईपी जनजागृती उपक्रमांनी सप्ताह राबविला   जळगाव ,   ता. ३० : देशात राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने "शिक्षण सप्ताह" साजरा करण्याच्या सूचना केंद्र शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. या अनुशंगाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २४ ते ३० या कालावधीत पथनाट्य , पॅनेल चर्चा, घोषवाक्य लेखन, निबंध स्पर्धा व विविध शाळामध्ये एनईपी जनजागृती हे विशिष्ट उपक्रम नियोजित करण्यात आले होते, त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश करून तो राबविण्यात आला. हा संपूर्ण सप्ताह जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.   समारोप कार्यक्रमात उपक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे समजावून सांगताना संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे २०४७ या वि...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “पारंपारिक दिवस” जल्लोषात साजरा

Image
विद्यार्थ्यांनी साकारला भारताच्या संस्कृतीचा बहुरंगी देखावा जळगाव , ता. १९  :  शहरालगत असलेल्या सावखेडा ‎ शिवार येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ' पारंपारिक दिवस ' अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धता विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून अचूकपणे उभी केली. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र , पश्चिम बंगाल , गुजरात , मेघालय , मणिपूर , गोवा , हिमाचल प्रदेश , तामिळनाडू आणि केरळ अशा विविध राज्यांतील पारंपारिक पोशाख परिधान केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने त्या त्या राज्याच्या संस्कृतीची झलक वेशभूषा , नृत्य , हावभाव आणि चालण्यातून प्रकट केली. मुलींनी  नऊवारी साडी , बंगाली टांट साडी , केरळी कसावू साडी , मणिपुरी पोशाख घातले होते , तर मुलांनी धोतर-कुर्ता , पगडी , राजस्थानी अंगरखा , आणि तामिळ पंचा व अंगवस्त्र यांसारखे पारंपारिक पोशाख परिधान केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर विविध राज्यांतील लोकनृत्य , गीतं , आणि फॅशन शो सादर करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी , शिक्षक आणि पालक...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन संपन्न

Image
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी उच्च शिक्षणातील नाविन्यपूर्णता , संशोधन व उद्योजकतेचे महत्त्व केले अधोरेखित ; महाराष्ट्रासहित विविध राज्यातील ८० प्राध्यापकांचा सहभाग जळगाव , ता. २१ :   जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंटतर्फे शिक्षण मंत्रालयाचे इनोव्हेशन सेल व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहयोगाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन औरंगाबाद येथील मॅजिक इन्क्यूबेटरचे संचालक श्री. प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. आठवडाभराच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल , अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापकासहित महाराष्ट्र व  विविध राज्यातील ८ ० जण सहभागी होणार आहे. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे समजावून सांगताना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , “इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप" हा या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य विषय असून प्राध्याप...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Image
गुरुजनांचा गौरव व विद्यार्थ्यांचे मनमोहक सादरीकरण जळगाव , ता. १ :  शहरालगत असलेल्या सावखेडा ‎ येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल , जळगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदनेने केली , ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एक भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. सिया विसावे , स्वरा वाघ आणि यजुर्व साठे यांनी गुरुंच्या महत्त्वावर प्रभावी भाषण सादर केले. आर्ना पाटील , जैनम गादीया , आर्या नाहटा आणि सान्वी बविस्कर यांनी गुरुंच्या गौरवासाठी सुंदर गीते सादर केली. तसेच यावेळी गुरुप्रेम व्यक्त करणाऱ्या कवितांचे सादरीकरण कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ज्यामुळे उपस्थित शिक्षक भावूक झाले. मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी आपल्या भाषणात गुरुंचे समाजातील योगदान , विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील त्यांची भूमिका आणि शिक्षणाच्या पवित्रतेबद्दल भाष्य करत सर्व शिक्षकांचे आभार मान...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात २१ ते २५ दरम्यान एमओई-एआईसीटीई प्रायोजित “इनोव्हेशन अँड "एंटरप्रेन्योरशिप" फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

Image
नामांकित उद्योगतज्ज्ञ , संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन ; आयपीआर , फायनान्शियल प्लॅनिंग , लीन स्टार्टअप , बिझनेस मॉडेल कॅनव्हास ,  गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजी , उद्योजकता शिक्षणातील नवनवीन पद्धती यावर सखोल सत्रे जळगाव , ता. ०७ : शिक्षण मंत्रालयाचे इनोव्हेशन सेल व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद प्रायोजित “इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप" या विषयावर पाच दिवसीय ऑफलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम  (एफडीपी) ता. २१ ते २५ जुलै या कालावधीत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारत सरकारकडून या एफडीपी कार्यक्रमासाठी ₹ ३.५ लाखांचे प्रतिष्ठित अनुदान देखील प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञान , संशोधन आणि अध्यापन पद्धती सतत बदलत असतात. उत्तम अध्यापनासाठी केवळ विषयाचे ज्ञान पुरेसे नसते , तर विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचवण्याचे कौशल्यही लागते तसेच उद्योग जगतातील बदल व गरजा लक्षात घेऊन प्राध्यापकांचे ज्ञान अपडेट करणे गरजेचे असून   याच बाबीचा मागोवा घेवून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे प्रा...