नवीन शैक्षणिक धोरण, नवीन वाटा, नवीन भविष्य : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा”चा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; पथनाट्य, घोषवाक्य लेखन, निबंध स्पर्धा व विविध शाळामध्ये एनईपी जनजागृती उपक्रमांनी सप्ताह राबविला


 जळगाव, ता. ३० : देशात राबविल्या जात असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने "शिक्षण सप्ताह" साजरा करण्याच्या सूचना केंद्र शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. या अनुशंगाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २४ ते ३० या कालावधीत पथनाट्य, पॅनेल चर्चा, घोषवाक्य लेखन, निबंध स्पर्धा विविध शाळामध्ये एनईपी जनजागृती हे विशिष्ट उपक्रम नियोजित करण्यात आले होते, त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश करून तो राबविण्यात आला. हा संपूर्ण सप्ताह जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.  

समारोप कार्यक्रमात उपक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे समजावून सांगताना संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे २०४७ या विकसित भारताचं व्हिजन असून हे देशभरातील संस्थांनी जर यशस्वीपणे राबविला तर आपले जॉब सिकर पेक्षा स्टार्टप इंडियाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि याचाच मागोवा घेत या विध्यार्थीभिमुख धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे.यात एनईपीतील मुख्य क्रेडीट ट्रान्सफरची संधी महाविद्यालयातील अनेक विध्यार्थ्यांना देण्यात आल्याने यावर्षी २००० विध्यार्थ्यानी ऑनलाइन सर्टिफिकेटचा फायदा घेतला. तसेच तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन, उद्योजकता, प्रॉब्लेम सोल्विंग अॅप्रोच आणि प्रयोगशिलतेद्वारे विध्यार्थ्यांना प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जात असून फक्त थेरीवर भर न देता प्रत्यक्ष कृती, बदल, दृष्टीकोन, प्रोजेक्ट बेस लर्निग, सहा महिन्यांची इंडस्ट्रियल व्हिजीट आणि भविष्यातील उद्दिष्टांवर महाविध्यालयात भर देण्यात येत आहे. तसेच विध्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व त्यांनी ती घेण्याची पद्धत तसेच अखेरीस एक्झामिनेशन सिस्टीम करण्याची पारदर्शक प्रक्रिया हे अत्यंत महत्वाचे असून हा जो आउटकम बेस एज्युकेशन, विध्यार्थ्यांना टीचिंग लर्निगमध्ये देण्यात आलेली फ्लेक्सिबिलिटी, मल्टीपल एग्जिट-मल्टीपल एंट्री, ड्यूल डिग्री प्रोग्राम या सर्व बाबीचा रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची संपूर्णतः अंमलबजावणी आमच्या महाविध्यालयात केल्याचे समाधान व आनंद असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या सप्ताहाअंतर्गत विध्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्वत्याचे लाभविविध पैलू समजावून सांगण्यात आले. या मध्ये एबीसी अर्थात ऍकेडेमिक बँक क्रेडिटसब्जेक्ट बास्केटमेजर मायनर४ वर्षांची डिग्री काय असेल, डिग्री मध्ये सोडल्यावर प्रमाणपत्र कधी मिळेल या सर्वांबद्दल विस्तृत माहित संपूर्ण सप्ताहभर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. पूजा नवल, प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांनी साधले. हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी निधी बाजपेयी, रिया भंगाळे, श्रेयस शेजवाल, भूमिका जाधवनी, प्रियल सोनवणे, उमेश झुरके, लोकेश हिवाळे, प्रथमेश मिसार, भाग्येश चौधरी, नकुल महाजन या एनईपी सारथी विध्यार्थ्यानी अथक परिश्रम घेतले. सदर सप्ताहाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश