जी. एच. रायसोनी महाविध्यालयात २१ ते २५ दरम्यान एमओई-एआईसीटीई प्रायोजित “इनोव्हेशन अँड "एंटरप्रेन्योरशिप" फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम
नामांकित उद्योगतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन ; आयपीआर, फायनान्शियल प्लॅनिंग, लीन स्टार्टअप, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजी, उद्योजकता शिक्षणातील नवनवीन पद्धती यावर सखोल सत्रे
जळगाव, ता. ०७ : शिक्षण मंत्रालयाचे इनोव्हेशन सेल व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद प्रायोजित “इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप" या विषयावर पाच दिवसीय ऑफलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) ता. २१ ते २५ जुलै या कालावधीत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारत सरकारकडून या एफडीपी कार्यक्रमासाठी ₹३.५ लाखांचे प्रतिष्ठित अनुदान देखील प्राप्त झाले आहे.
तंत्रज्ञान, संशोधन
आणि अध्यापन पद्धती सतत बदलत असतात. उत्तम अध्यापनासाठी केवळ विषयाचे ज्ञान पुरेसे
नसते, तर
विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचवण्याचे कौशल्यही लागते तसेच उद्योग
जगतातील बदल व गरजा लक्षात घेऊन प्राध्यापकांचे ज्ञान अपडेट करणे गरजेचे असून याच बाबीचा मागोवा घेवून फॅकल्टी डेव्हलपमेंट
प्रोग्राम द्वारे प्राध्यापकांना नवीन ट्रेंड्स, संकल्पना, संशोधन
पद्धती याबद्दल माहिती मिळावी तसेच सॉफ्ट स्किल्स, संशोधन लेखन, इनोव्हेशन, स्टार्टअप, एआय, डेटा
सायन्स अशा नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण प्राध्यापकांना मिळावे या अनुषंगाने जी.
एच. रायसोनी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला
असल्याची माहिती या उपक्रमाच्या प्रमुख संयोजीका व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या
संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन
नवी दिल्ली येथील एआयसीटीई एमओई इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ. योगेश ब्राह्मणकर व
औरंगाबाद येथील मॅजिक इन्क्यूबेटरचे संचालक श्री. प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते
होईल. तर या पाच दिवसीय उपक्रमात एआयसी महिंद्रा विद्यापीठचे सीईओ इस्माईल अकबानी, जेआयआयएफचे
उपाध्यक्ष भरत ओसवाल, कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमधील इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. भूषण चौधरी, इनोव्हेशन
अँड इनक्यूबेशनचे संचालक डॉ. राजेश जावळेकर, सीओईपी वेलनेस सेंटर
“मित्रा”च्या प्रमुख डॉ. क्षिप्रा मोघे, ट्रायझ एक्सपर्ट व कमिन्स
इंडियाचे तुषार कनिकदले, नाशिक येथील कॉग्निडॉल्फचे
मयूर तांबे, एआयसीटीई एमओई इनोव्हेशन सेलचे इंडोव्हेशन
मॅनेजर उमेश राठोड, खान्देश उद्योग प्रबोधिनीचे
हर्षल विभांडिक, अनंतम इकोसिस्टम्सचे संस्थापक चिंतन ओझा
हे स्टार्टअप इकोसिस्टम, इनोव्हेशन मेथडोलॉजी, डिझाईन
थिंकिंग, आयपीआर, फायनान्शियल
प्लॅनिंग, लीन
स्टार्टअप, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, गो-टू-मार्केट स्ट्रॅटेजी, उद्योजकता
शिक्षणातील नवनवीन पद्धती यावर सखोल मार्गदर्शन करणार आहे.
इनोव्हेशन अँड "एंटरप्रेन्योरशिप क्षेत्रातील आघाडीचे उद्योगतज्ज्ञ, नामांकित शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ या उपक्रमात मार्गदर्शन करणार असून सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांमधील विध्यार्थी, नवउद्योजक व संशोधक यांच्यासाठी हा कार्यक्रम खुला असून ज्ञानवाढीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याची माहिती जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी दिली.
Comments
Post a Comment