जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गुरुजनांचा गौरव व विद्यार्थ्यांचे मनमोहक सादरीकरण

जळगाव, ता. १ :  शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, जळगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदनेने केली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एक भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. सिया विसावे, स्वरा वाघ आणि यजुर्व साठे यांनी गुरुंच्या महत्त्वावर प्रभावी भाषण सादर केले. आर्ना पाटील, जैनम गादीया, आर्या नाहटा आणि सान्वी बविस्कर यांनी गुरुंच्या गौरवासाठी सुंदर गीते सादर केली. तसेच यावेळी गुरुप्रेम व्यक्त करणाऱ्या कवितांचे सादरीकरण कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ज्यामुळे उपस्थित शिक्षक भावूक झाले.

मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी आपल्या भाषणात गुरुंचे समाजातील योगदान, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील त्यांची भूमिका आणि शिक्षणाच्या पवित्रतेबद्दल भाष्य करत सर्व शिक्षकांचे आभार मानले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संस्कारांची आणि गुरुजनांप्रती असलेल्या आदराची साक्ष देणारा ठरला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ध्रुवी चौधरी आणि कीर्तन अग्रवाल यांनी उत्तमरित्या पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश