जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “पारंपारिक दिवस” जल्लोषात साजरा

विद्यार्थ्यांनी साकारला भारताच्या संस्कृतीचा बहुरंगी देखावा

जळगाव, ता. १९  :  शहरालगत असलेल्या सावखेडा शिवार येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये 'पारंपारिक दिवस' अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धता विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून अचूकपणे उभी केली.
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, मेघालय, मणिपूर, गोवा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा विविध राज्यांतील पारंपारिक पोशाख परिधान केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने त्या त्या राज्याच्या संस्कृतीची झलक वेशभूषा, नृत्य, हावभाव आणि चालण्यातून प्रकट केली. मुलींनी  नऊवारी साडी, बंगाली टांट साडी, केरळी कसावू साडी, मणिपुरी पोशाख घातले होते, तर मुलांनी धोतर-कुर्ता, पगडी, राजस्थानी अंगरखा, आणि तामिळ पंचा व अंगवस्त्र यांसारखे पारंपारिक पोशाख परिधान केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर विविध राज्यांतील लोकनृत्य, गीतं, आणि फॅशन शो सादर करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “ पारंपारिक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीची विविधतेतील एकता अनुभवली. ही शिकवण त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शाळेचे विद्यार्थी  पहेल गादिया व विहान मुथा यांनी समर्थपणे पार पाडले. त्यांच्या प्रभावी साथसंगतने  संपूर्ण कार्यक्रमाला रंजक स्वरूप दिले.कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” या देशभक्तिपर गीताने करण्यात आली. तर सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी अभिनंदन केले. यावेळी संपूर्ण स्कूल एक रंगीत आणि सांस्कृतिक उत्सवाचे केंद्र बनली होती.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश