जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले ‘२५१’ कॉपीराईट
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त नवीन विक्रम नोंदवत विद्यार्थी व प्राध्यापकांची अभिमानास्पद कामगिरी ; विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव जळगाव , ता. २८ : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “ जागतिक बौद्धिक संपदा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकूण २५१ कॉपीराईट महाविद्यालयाच्या विध्यार्थी व प्राध्यापकांनी दाखल करत नवीन विक्रम नोंदविला . गेल्या चार वर्षापासून असे विक्रम करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवत असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने २०२२ ला १५४ – २०२३ ला १०८, २०२४ ला १९४ कॉपीराईट व १८ पेटंट अन यावर्षी जागतिक बौद्धिक संपदा ...