जी. एच. रायसोनी महाविध्यालयात महिला डेंटिस्टना आर्थिक व डिजिटल साक्षरता तसेच सायबर सिक्युरिटीचे धडे
रायसोनी पिंक हॅट्स क्लब व वूमन्स डेंटल फॉरम आयडीएचा संयुक्त उपक्रम ; जळगाव महिला डेंटिस्टचा मोठ्या संख्येने सहभाग
जळगाव, ता.०९ : जगाला आर्थिक व डिजिटल साक्षरतेची गरज आहे. शिक्षक व प्राध्यापकांच्या माध्यमातून आर्थिक-डिजिटल साक्षरतेमध्ये खूप काम करता येईल, त्यातून मोठा बदल होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही आपल्यात बदल केला पाहिजे. साक्षरतेच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळता येईल आणि सुदृढ जागतिक समाज निर्माण करू शकतो, असे मत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मांडले.
येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिलांसाठी
काम करणाऱ्या “पिंक हॅट्स क्लब” व वूमन्स डेंटल फॉरम आयडीए जळगाव ब्रांचच्या संयुक्त
विध्यमाने “टेकस्माईल : एमपॉवरिंग डेंटिस्ट इन डिजिटल एज” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांच्यासमवेत प्रसिद्ध दंतरोगतज्ञ व वूमन्स डेंटल फॉरम आयडीए जळगाव ब्रांचच्या
अध्यक्षा डॉ.वर्षा चौधरी या उपस्थित होत्या. अध्यक्षीय मनोगतात पुढे बोलताना संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कि, सायबर सिक्युरिटी, आर्थिक व डिजिटल साक्षरतेचा विचार करता याचं जोपर्यंत ज्ञान सर्वश्रुत होत नाही तोपर्यंत विविध समस्यांना निमंत्रण
देण्यासारखे आहे. त्यामुळे “पिंक हॅट्स क्लब” व वूमन्स डेंटल फॉरम यांनी उभारलेल्या
या उपक्रमात विविध क्षेत्रातील
तज्ञांचे सखोल मार्गदर्शन उपस्थित महिला डॉक्टरांना नक्कीच उपयोगी
पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा.
कल्याणी नेवे - (सेटअप टू स्क्रीन शेअर : नेव्हिगेटिंग प्रोजेक्टर अँड वाय-फाय ई-मीटिंग), प्रा. डॉ.
स्वाती पाटील - (सीमलेस पेमेंट अँड स्मार्ट बुकिंग : रेड फ्लीनिग डिजिटल
एक्सपीरियंस), प्रा. रफिक शेख – (सायबरसुरक्षा १०१ : प्रोटेक्टिंग युवरसेल्फ इन द डिजिटल वर्ल्ड), डॉ.
सोनल पाटील – (प्रोटेक्टिंग युवरसेल्फ इन अ कनेक्टेड
वर्ल्ड : सायबर अवरनेस फॉर ऑल), प्रा. श्रिया कोगटा - (फ्रॉम बजेटिंग टू इन्वेस्टिंग :
अंडरस्टैंडिंग फायनान्सिअल लिटरसी), प्रा. पूजा नवल - (क्रीयेटिंग अँड शेअरिंग ऑन सोशल मीडिया : हाउ टू ओपन, शेअर अँड पोस्ट विथ इसे) यांनी या विविध
मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी तर आभार वूमन्स डेंटल फॉरम आयडीएच्या सचिव डॉ. एकता अग्रवाल, डॉ. श्रद्धा सोमाणी, डॉ. मेघना नारखेडे यांनी मानले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय “पिंक हॅट्स क्लब”च्या सहकारी प्राध्यापकांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले
Comments
Post a Comment