जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले ‘२५१’ कॉपीराईट
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त नवीन विक्रम नोंदवत विद्यार्थी व प्राध्यापकांची अभिमानास्पद कामगिरी ; विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव
जळगाव, ता.
२८ : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण
करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला
जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग
अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “जागतिक बौद्धिक संपदा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकूण २५१ कॉपीराईट महाविद्यालयाच्या विध्यार्थी व
प्राध्यापकांनी दाखल करत नवीन विक्रम नोंदविला. गेल्या चार वर्षापासून
असे विक्रम करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवत
असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने २०२२ ला १५४ – २०२३ ला १०८, २०२४ ला १९४
कॉपीराईट व १८ पेटंट अन यावर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या औचित्याने २५१ कॉपीराईट नोंदवून
मोठी कामगिरी केली.
इस्टीट्युटच्या
इंडस्ट्री प्रॅक्टीसेस, अॅकडमिक, शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत
यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टर, लॅब मॅन्युअल, कोर्स नोट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मोनोग्राफ आदी बाबींवर हे कॉपीराइट दाखल करण्यात आले आहेत.
हा
उपक्रम इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स सेल व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल यांच्या
संयुक्त विद्यमानाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मिनिस्ट्री
ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दिल्ली गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे एक्झामिनर ऑफ पेटंट्स अँड
डिझायनर श्री. यासिर अब्बास झैदी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
करतांना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
नमूद केले कि, बौद्धिक संपत्तीचे
हक्क हे निर्मात्याला त्याच्या अविष्काराचे, विचारांचं
आणि कलात्मक अभिव्यक्तीचे संरक्षण देतात. हे हक्क म्हणजे वैयक्तिक तसेच देशाच्या
आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आयुधे आहेत. ते देशाच्या प्रगतीचे मापदंड ठरतात. म्हणूनच
कोणत्याही देशाच्या प्रगतीचा आलेख मोजताना त्या देशाची बौद्धिक संपदेमधील कामगिरी, म्हणजेच त्या देशात होणारी
संशोधने, पेटंट हा महत्त्वपूर्ण घटक ठरतो. तसेच नवीन
शैक्षणिक धोरणानुसार विध्यार्थ्यांचे अध्ययन येथे सुरु असून महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य
आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा
मुख्य उद्देश समोर ठेवून असे उपक्रम येथे दरवर्षी राबविले जातात तसेच भारताच्या
जडण-घडणीत रायसोनी इस्टीट्युटचे संशोधित तंत्रज्ञान, डिझाईन
व उत्पादनाचे मोठे योगदान असून येथील विध्यार्थी व प्राध्यापक सतत याबाबतीत
अग्रेसर असतात असे सांगत त्यांनी भारतीय पेटंटचे महत्त्व, भारतातील पेटंट फाइल्सची वर्तमान स्थिती, पेटंट
हक्काचे आर्थिक महत्त्व, भारतीय पेटंट संरक्षणाची
जागतिक परिस्थिती, भौगोलिक निर्दर्शन अशा विविध
मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
यानंतर
कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले श्री. यासिर अब्बास झैदी यांनी
म्हटले कि, बौद्धिक संपदा निर्माण करणं आणि ती राखणं, तसंच इतरांच्या बौद्धिक संपदेचं कायद्यानुसार जे मूल्यमापन
झालेलं असेल, त्यानुसार तिचा मान राखणं, हाच आजच्या 'जागतिक बौद्धिक संपदा दिना'चा उद्देश आहे, बौद्धिक संपदेचे सरंक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब असून, कॉपीराइटचा लाभ व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंत व्यक्तीच्या
कुटुंबियांना रॉयल्टी मिळण्याची तरतूद भारतीय कायद्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ज्ञान आणि तंत्रज्ञानातील कल्पक संशोधनांनी सर्व स्तरांवरील मानवी जीवनात
क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. संशोधकाच्या सर्जनशील कल्पकतेचा संशोधनाच्या
वापरावरील हक्क आता सर्वमान्य आहे. समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करून घेता
यावा, अशा संशोधनाला साधनसामुग्रीची वाण भासू नये, किंबहुना समाजातील संशोधकीय गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने पेटंट कायद्यांच्या स्वरूपात नियंत्रणव्यवस्था जगभर
अस्तित्वात आणण्यात आली आहे. भारतही त्याला अपवाद नाही असे मत त्यांनी यावेळी
नोंदविले सदर कार्यशाळेसाठी अॅकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन
प्रा. डॉ. मुकुंद पाटील तसेच प्रा. डॉ. निलेश इंगळे यांनी समन्वय साधले तर
सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा सराफ यांनी केले.
या
विविध विषयांवर “कॉपीराईट” दाखल
बँक
अकाउंट हॅण्डलिंग युजिंग सी प्लस प्लस, स्टुडन्ट अटेंडन्स सिस्टिम
युजिंग फेसिअल रेकॉग्निशन, नेटफ्लिक्स क्लोन, प्रस्नलाईज न्यूज ऍग्रीगेटर, टेलिफोन रेकॉर्ड
सॅंडलिंग युजिंग सी प्लस प्लस, मल्टी कॅल्क्युलेटर,ईमेल व्हॅलिडेटर, रेझ्युमे बिल्डर, टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट कन्व्हर्टर, वेदर
अॅप, वेदर पाल, बबल शूटिंग अॅप,
वेब सर्व्हर मॉनिटरिंग सिस्टम, स्पॉटिफाय
क्लोन, ऑनलाइन कार पार्किंग सिस्टम, एआय चॅटबॉट,
व्हिज्युअल माउस, सायबर धोके आणि जागरूकता अॅप, अमेझॉन क्लोन, युट्यूब व्हिडिओ
डाउनलोडर,
ऑनलाइन क्विझ अॅप्लिकेशन ई-व्होटिंग सिस्टम, स्मार्ट होम ऑटोमेशन
सिस्टम, टर्क हेल्पर, न्यूज वेब
अॅप्लिकेशनवरील पोस्टर, क्विझ अॅप्लिकेशन, ऑनलाइन बस बुकिंग,
पायथॉन युजिंग पिझ्झा बिलिंग सिस्टम, रिअल
टाइम लोकेशन ट्रॅकर, ऑनलाइन बुकिंग सिस्टम, जेश्चर रिकग्निशन
सिस्टम, ऑनलाइन फूड बुकिंगसाठी वेबसाइट २४/७, कॅफे मॅनेजमेंट सिस्टम, टू-डू लिस्टफिचरसह टास्क
मॅनेजमेंट अॅप्लिकेशन, बाल सुरक्षेसाठी अॅप, ट्रान्सलेट बॉट, रेस्टॉरंट बिलिंग मॅनेजमेंट
सिस्टम, पायथॉन युजिंग कार गेम, एआय
चॅट बॉट, अमेझॉन अॅप, रिअल-टाइम चॅट अॅप्लिकेशन, चॅट बॉट सॉन्ग रेकमेंडर सिस्टम, पीडीएफ कन्व्हर्टर,
झिप फाइल क्रॅकर, अन्न
ऑर्डर करण्याचे अॅप, हवामान अंदाज अॅप, आयओटी आधारित होम ऑटोमेशन सिस्टम, कॅफे व्यवस्थापन
Comments
Post a Comment