जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “टायनी एक्सप्लोरर समर कॅम्प” उत्साहात संपन्न
जळगाव, ता. २१ : शहरातील गणपती नगर येथील जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागामधील प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक
८ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान “टायनी एक्सप्लोरर” या शीर्षकाखाली उन्हाळी
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन गोष्टी शिकायला प्रोत्साहन देणारे “टायनी
एक्सप्लोरर” हे एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते
या शिबिरात लर्न अँड हेव्ह
फन विथ हॅड्स ओन सायन्स अॅक्टीव्हीटी, काउंटीग, मॅचिग, सॉर्टिंग, आउटडोर एक्सप्लोरेशन, आर्ट्स अँड क्राफ्ट्स, म्युझिक अँड मुव्हमेंट, लाईफ स्कील्स, योगासने, झुम्बा या विविध
प्रकारांचा समावेश करत अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी
देण्यात आले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा
यांनी आपल्या मार्गदर्शनात, शिक्षणाबरोबरच
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, विविध लाईफ
स्कील्सची त्यांना माहिती मिळावी तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा
हा हेतू समोर ठेवून “टायनी एक्सप्लोरर” हे एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते
असे नमूद केले.
या शिबिरात कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे यांनी सायन्स एक्सपेरिमेंट, ग्लोब व ब्रेन बुस्टर अॅक्टीव्हीटीज सादर करत टीव्ही, इंटरनेट व मोबाइल यांच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगत
समुपदेशन केले. या उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी
पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment