जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविध्यालयात 'फाउंडर्स डे' उत्साहात संपन्न

रुग्णाना फळ वाटप, वृक्षारोपण, पालक-विद्यार्थी स्पर्धासारखे विविध उपक्रम घेवून स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांची जयंती साजरी जळगाव, ता. २९ : जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे संस्थापक स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या स्मृतींना समर्पित करत, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू या नवनिर्मितीला प्रोत्साहन थीमवर आधारीत पालक-विद्यार्थी स्पर्धा, वृद्धाश्रम व शासकीय सामान्य रुग्णालयातील रुग्णाना फळ वाटप, वृक्षारोपण, निबंध स्पर्धाव्दारे सावखेडा परिसरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात ‘ फाउंडर्स डे ’ सर्व विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या सुरुवातीला स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र रायसोनी, ज्योत्सना रायसोनी तर परीक्षक म्हणून मानसी चौधरी यांची उपस्थिती होती. कै. ग्यानचंद रायसोनी यांनी सुरू केलेल्या रायसोनी इस्टीट्युट या शैक्षणिक ग्रुपचा आज अख्या जगात मोठा विस्तार झाला आहे. हि शैक्षणिक क्रांती आणखी वाढावी आणि य...