नवीन शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतर

जगामध्ये बदलाचे वारे मोठ्या झपाट्याने वाहत आहेत. कोणताही देश समाज या बदलत्या प्रवाहापासून वेगळा राहू शकत नाही. किंबहुना याचा समर्थपणे सामना केल्यावाचून उपाय नाही. अशा परिस्थितीमध्ये नवीन शैक्षणिक धोरण हा आशेचा किरण आहे. एकीकडे बेरोजगारीची समस्या झपाट्याने वाढत असताना तितक्याच मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता भेडसावत आहे. वाढत्या लोकसंख्येला आवश्यक सोयी, ऊर्जा, पाणी, अन्न, स्वच्छ वातावरण इत्यादी गोष्टीची मोठ्या प्रमाणात असलेली गरज पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचबरोबर कारखानदारी, शेती, व्यवसाय, सामाजिक उपक्रम व तंत्रज्ञान विकासासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आ वासून उभे आहे. अशा बहुआयामी ध्येयप्राप्तीसाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी सिद्ध व्हावे व आपण सर्वांनी यासाठी कसोशीने प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे. शिक्षणाचा मुख्य उद्देश मानवाचे जीवन समृद्ध व विकसित करणे हा आहे. समृद्धी व विकसनशीलता ही सतत साकारणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या गतिशील जगामध्ये शिक्षणाची शाखानिहाय विभागणी न करता बहुआयामी, बहुशाखीय व बहुकौशल्य मनुष्यबळ निर्माण करणारी पर्यायी शिक्षण प्रणाली हेच या नवीन शैक्षणिक धोरणाची संकल्पना आहे.

उच्च शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा अनेक उपाययोजना या नवीन शैक्षणिक धोरणात सुचविलेल्या आहेत. यात प्रामुख्याने आपल्या तरुणाईच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांची वैयक्तिक ध्येय, बौद्धिक विकास, सामाजिक दायित्व व समाज निर्मितीत सकारात्मक सहभाग या दृष्टीने क्रमशः जडणघडण उच्च शिक्षणाच्या पातळीवर करण्याचे धोरण सुचविण्यात आले आहे. याच अनुषंगाने संशोधनपर विद्यापीठ, बहुशाखिय शिक्षण विद्यापीठ व महाविद्यालय यांची रचना करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये स्पर्धा, संशोधन व कौशल्यधारीत विद्यार्थी निर्माण करण्याचाही प्रयत्न या शैक्षणिक धोरणात प्रतिबिंबित होतो. व्यावसायिक शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टकोन निर्माण व्हावा; कौशल्य आधारित जडणघडण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीत उपाययोजना अधिक कार्यक्षमपणे राबवणे ही फार महत्त्वाची बाब ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये यामुळे उच्च शिक्षणाची व्याप्ती तर वाढेलच पण त्याचबरोबर एकूणच शिक्षण घटकांना हे बदल सकारात्मकतेने स्वीकारून नवनिर्माणाच्या यज्ञांमध्ये समाविष्ट व्हावी लागणार आहे.  हे उच्च शिक्षणातील बदलाचे यश सर्व विद्यापीठ, महाविद्यालये व मुख्यतः शिक्षक यांच्या प्रयत्नातून नक्कीच यशस्वी होईल.

अशा या सर्व समावेशक शैक्षणिक धोरणाचे स्वागत सर्व समाज घटकातून होत आहे. हे निश्चितच उत्साहवर्धक आहे. या शैक्षणिक धोरणामुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन पद्धतीत अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. हे बदल अगदी सुरुवातीपासून म्हणजेच पूर्व प्राथमिक स्तरापासून आहेत. यातून शिक्षक, पालक, व्यवस्थापन, प्रशासन आणि समाज यांचा शिक्षणप्रणाली बाबतचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला जाणार आहे. आजच्या औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक व सहज शिक्षणाची जोड देऊनच ही गरज पूर्ण होऊ शकेल यासाठी आवश्यकता आहे ती सर्वांच्या सामूहिक इच्छाशक्तीची आणि प्रयत्नाची. तेव्हा एकात्मिक शिक्षणातून आपले समाजजीवन विविधांगी समृद्ध करण्याचे संकेत या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पहावयास मिळतात.

देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यातील तंत्रज्ञानाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेले आहे. उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवण्याचा, उत्पादनाचा वेग वाढवण्यास आधुनिक उत्पादन तंत्राचा उपयोग करावा लागेल. आधुनिक उत्पादन तंत्रात कुशल, प्रगत, प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असते. त्यासाठी कौशल्यधारित घटकांची  निर्मिती व्हावी म्हणून सरकारी पातळीवरही काही योजना राबविल्या जात आहेत. त्यात औद्योगिक प्रशिक्षण इंटर्नशिप, इंडक्शन, उद्योजकता इत्यादींना महत्व प्राप्त झाले आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना याच संदर्भातील एक महत्वपूर्ण योजना म्हणता येईल. विविध व्यवसायाचे तंत्रज्ञानासंदर्भातील विज्ञान आणि तांत्रिक शाखातील मुलतत्वे व व्यावसायिक उपयोगिता यांची सांगड घालण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना अविकसित पैलूंचा विकास झाला पाहिजे. निदान त्या दिशेने प्रयत्न झाली पाहिजे यावर आजच्या शिक्षण पद्धतीचा मुख्य भर आहे.

आज अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन स्वयंरोजगाराकडे वळले आहेत. स्वतःचा छोटासा का होईना परंतु एखादा व्यवसाय उभा करणे. विविध उद्योगधंद्यांना लागणाऱ्या एखाद्या प्रॉडक्टचे उत्पादन करणे यात त्यांना जास्त रस आहे. त्यासाठी स्वतःचा एखादा छोटासा स्टार्टअप सुरू करणे आणि त्याला हळूहळू वाढविणे यात अनेक विद्यार्थी उत्सुक असलेले दिसून येतात. त्यामुळे पारंपारिक अभियांत्रिकी शिक्षण बदलून त्या जागी स्वयंपूर्ण रोजगाराची उभारणी करण्याचे कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे याकडे शासनानेही विशेष लक्ष दिले आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रमाची घडण करावी, असे निर्देश दिले गेलेले आहेत. कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानेही आपल्या स्तरावर अभ्यासक्रमात हे सगळे नवीन बदल केलेले आहेत. विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञान व्यवसायातील विकास घडून येण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमधील अविकसित पैलूची घडण करणारा, त्यांच्यातील कौशल्याना उजागर करणारा, नाविन्यपूर्ण व आधुनिक असे विषय व इतर अनेक विषयांची निवड करण्याची मुभा विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून देण्यात आलेली आहे. आजचे बदलते तंत्रज्ञान आणि त्यांची आव्हाने यांना तोंड देण्यास सक्षम असणारा व उद्योग कुशल तरूण हाच खरा आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहे. भारताकडे जगात सर्वात जास्त मनुष्यबळ आहे ते आजच्या उद्योगधंद्यांना आवश्यक आहे.

 

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात डबल डिग्री प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढले आहे. थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मुख्यत्वे एक्सेस,  इक्वलिटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी, अकाउंटॅबिलिटी या पाच स्तंभांवर आधारित आहे  तसेच इंजीनियरिंग व बिझनेस मॅनेजमेंट या शाखांमध्ये मेजर आणि मायनरया नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या बाबीचा समावेश आपण करीत असून एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल.तसेच ओपन इलेक्टिव सब्जेक्ट, ऑन द जॉब ट्रेनीग, फिल्ड प्रोजेक्ट, समाजाभिमुख विविध कार्यक्रम, इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या संस्कृती व ज्ञान या विविध वैशिष्टपूर्ण विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करत रायसोनी महाविध्यालय विध्यार्थ्यांना दोन क्रेडीट देणार असल्याचे नियोजन आहे. तसेच रायसोनी महाविद्यालय मल्टीडिसिप्लनरी अॅप्रोच इंट्रोड्यूस करीत असून, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला एकदा विध्यार्थी तो शिकत असलेल्या शाखेत मेजर विषयांचे क्रेडीट मिळवेल व त्याच्या शाखेव्यतिरिक्त त्याला इतर शाखेतील विषय शिकायचे आहेत. (उदा. विद्यार्थी मॅकेनिकल शाखेत शिकत आहे आणि त्याला इतर विषयात जसे कि कॉम्प्यूटर अभियांत्रिकीच्या मायनरसाठी विषय घेता येतील) म्हणजेच कि, रायसोनी महाविध्यालयात एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व व अंगभूत गुणांचा विकास हा समतोल राखण्याची अपेक्षा धोरणात व्यक्त करण्यात आली असल्याने याची सर्वांग अंमलबजावणी रायसोनी महाविद्यालयात केली जाणार आहे. वक्तृत्व, संगीत, साहित्य, कला, टीम वर्क, नेतृत्व, संशोधन, प्रयोग, उद्योजकता, समाजसेवा, नैतिकता, साहस, राष्ट्रप्रेम, परोपकार, मानवता, खेळ, चारित्र्य अश्या विविध पैलूंची ओळख व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जावे, या विविध बाबीवर फोकस करण्यात आले आहे. याचबरोबर विद्यार्थाला नेमून दिलेल्या ठराविक अभ्यासक्रम देखील पूर्ण करावा लागणार आहे. परीक्षेत केवळ उत्तम गुण मिळवणे यापेक्षा त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय जास्त भर देणार असून सदैव कार्यतत्पर देखील आहे.

विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

महाविध्यालयाचे दर्जेदार व उपयोजित असे बीबीए, बीसीए, एमबीए, एमसीए तसेच अभियांत्रिकीच्या कॉम्प्यूटर सायन्स अॅन्ड इंजिनीयरिंग, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, सिव्हील इंजिनियरिंग, मॅकानिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग, आर्टिफिशयल इंटेलीजन्स मशीन लर्निग, डेटा सायन्स तसेच एम.टेक (कॉम्प्यूटर इंजिनीयरिंग), एम.टेक सिव्हील (स्ट्रक्चरल इंजीनियरिंग), बी.कॉम (बिजनेस एडमिनिस्ट्रेशन), बी.कॉम (बँकिग & फायनान्स), बीएस्सी (एआय & एमएल) या अभ्यासक्रमाचा समावेश आहे

 


नाव :  प्रा. डॉ. संजय शेखावत

पद : डीन, अकॅडमिक जी. एच. रायसोनी कॉलेज

ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय, जळगाव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश