जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविध्यालयात 'फाउंडर्स डे' उत्साहात संपन्न

रुग्णाना फळ वाटप, वृक्षारोपण, पालक-विद्यार्थी स्पर्धासारखे विविध उपक्रम घेवून स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांची जयंती साजरी

 

जळगाव, ता. २९ : जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे संस्थापक स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या स्मृतींना समर्पित करत, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू या नवनिर्मितीला प्रोत्साहन थीमवर आधारीत पालक-विद्यार्थी स्पर्धा, वृद्धाश्रम व शासकीय सामान्य रुग्णालयातील रुग्णाना फळ वाटप, वृक्षारोपण, निबंध स्पर्धाव्दारे सावखेडा परिसरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात फाउंडर्स डेसर्व विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या सुरुवातीला स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र रायसोनी, ज्योत्सना रायसोनी तर परीक्षक म्हणून मानसी चौधरी यांची उपस्थिती होती.

कै. ग्यानचंद रायसोनी यांनी सुरू केलेल्या रायसोनी इस्टीट्युट या शैक्षणिक ग्रुपचा आज अख्या जगात मोठा विस्तार झाला आहे. हि शैक्षणिक क्रांती आणखी वाढावी आणि या ग्रुपचा नावलौकिक वाढावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, एकमेकांमध्ये परस्परभाव याबाबतचा आत्मविश्वास दिसतो. यामध्ये पालकांचा स्कूलबद्दल असलेला विश्वास अधोरेखित करण्यासारखा आहे. सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यासह सर्व समावेशक मूल्यशिक्षण पुरस्कार करणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमासह फाउंर्डस डेसाजरा करीत आहोत असे प्रतिपादन संयुक्तिकरित्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी केले.

कार्यक्रमाच्या आरंभी शाळेतील नर्सरी ते आठवीमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी कागद, पुठ्ठे आणि घरातील टाकाऊ वस्तू वापरून विविध कलाकृती साकारल्या. यामध्ये फ्लॉवरपॉट, कपाट, पेन स्टँड, शुभेच्छापत्रे, टोप्या अशा अनेक शोभिवंत वस्तूंचा समावेश होता. या सर्व वस्तूंचे प्रदर्शन शाळेत मांडण्यात आले होते. तसेच शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातर्फे मातोश्री वृद्धाश्रम व जिल्हाभरातून आलेल्या गरीब रुग्ण आणि नातेवाईकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ-बिस्कीट वाटप करण्यात आले त्याचा मोठा आधार यावेळी त्याना मिळाला. तसेच निसर्गाविषयी आपली आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी जळगाव परिसरातील विविध भागात वृक्षारोपण करत हा पर्यावरणशील उपक्रम देखील 'फाउंडर्स डे'च्या निमित्ताने राबविण्यात आला. या उपक्रमासाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले तर सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालक श्रेयसजी रायसोनी,संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व सौ पलक रायसोनी यांनी कौतुक केले.  

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश