जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगावता. २१ : येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग ही भारताची प्राचीन व वैभवशाली परंपरा आहे. योगशास्त्राचे महत्त्व संपूर्ण जगाने ओळखले असून आरोग्यासाठी योगाचे महत्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून  घोषित केला आहे.  जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये सातत्याने विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देऊन दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. योगा नियमित केल्यामुळे मन व शरिराकरिता कोणकोणते फायदे आहेत ते योगासने केल्यानंतरच समजू शकते. योगदिनाचे महत्त्व लक्षात घेता स्कूलच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या विविध आसनेओंकार करून आंतरराष्ट्रीय योगदिनास आपला सक्रिय सहभाग दिला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमास योगप्रशिक्षक निशिता रंगलानी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात योगप्रशिक्षक निशिता रंगलानी यांनी मनाची एकाग्रता ताण तणावाचे नियोजन व सुदृढ शरीर संपदेसाठी योगाभ्यास महत्वाचा आहे त्यासाठी  विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात सातत्य ठेवावे’ असे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमाप्रसंगी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी देखील  योगाभ्यासाचे महत्त्व विशद करून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका अल्फिया लेहरी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश