जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील टोस्टमास्टर्स क्लबला “चार्टर्ड” दर्जा प्राप्त
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अशा क्लबमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्व गुणवाढीवर भर ; विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग
जळगाव, ता. २७ : टोस्टमास्टर इंटरनॅशनल ही संस्था १९२४ पासून कार्यरत आहे. जगभरात १४५ देशात १६ हजार २०० क्लब्स असून ३ लाख ६४ हजारपेक्षा जास्त सभासद आहेत. आपल्यातील वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांना विकसित करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट्य असून २०१५ पासून जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम घेत विध्यार्थ्यांना उत्कृष्ट वक्ता घडवणारी हि चळवळ सतत सुरु असून याचेच फळ म्हणून आज जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील टोस्टमास्टर्स क्लबला “चार्टर्ड” दर्जा प्राप्त झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील या एकमेव क्लबला डिस्ट्रिक्ट 98 डीटीएम टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल क्लब ग्रोथ डायरेक्टर जॉयदीप भौमिक यांच्या हस्ते “चार्टर्ड स्टेटस क्लब” हा दर्जा बहाल करण्यात आला. यावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर येथील आरती देशपांडे, टोस्टमास्टर्स क्लबच्या चीफ मेंटर मनीषा झिल्पेलवर व मेंटर प्रा. प्रिया टेकवानी हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विध्यार्थ्यांमधील वक्तृत्व व नेतृत्व या गुणवाढीसाठी “टोस्टमास्टर्स क्लब” हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवीत असल्याचा अभिमान असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी, सर्वांना उच्च गुणवत्तेचे स्कीलबेस शिक्षण उपलब्ध करून देणे हा असून त्याचाच आधार घेत आम्ही विध्यार्थ्यांच्या ३६० डिग्री होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करीत असून थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात यात मास्टर क्लब, लेट्स टोक क्लब, म्युझिक क्लब, डान्स क्लब, फॅब्रिकेशन क्लब, पिंक हॅट्स क्लब, फोटोग्राफी क्लब यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध उपक्रमाचा समावेश आहे. मुळात आजच्या काळात “टोस्टमास्टर्स क्लब” सारखे व्यासपीठ विध्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे कारण आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असून एआय, मशीन लर्निग, ब्लॉगचेन टेक्नोलॉजीच्या या जगात क्रिएटीव्हीटी, क्रिटीकल थिंकीग, प्रोब्लेम सोल्विंग अॅप्रोच, वेल कम्युनिकीशेन, लीडरशिप हे विविध स्कील विध्यार्थ्यामध्ये आलेच पाहिजे आणि याच अनुषंगाने विध्यार्थ्याच्या व्यक्तीमहत्वाचा विकास व्हावा या हेतूने जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब” ची स्थापना करण्यात आली असून या क्लबला आता “चार्टर्ड” दर्जा प्राप्त झाल्याने विध्यार्थ्यानी अधिकाधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपले नेतृत्व कौशल्ये विकसित करावे अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते डिस्ट्रिक्ट 98 डीटीएम टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल क्लब ग्रोथ डायरेक्टर जॉयदीप भौमिक यांनी मार्गदर्शन केले कि, एखाद्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे आणि एखाद्यावर चांगली पहिली छाप सोडण्याचा प्रयत्न करणे यात फरक आहे. जसे कि लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अशी भावना मिळते की त्यांना माहिती दिली जात आहे. एखाद्या प्रसंगासाठी ओव्हरड्रेसिंग, तुमच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या कथा सांगणे आदी केल्याने समोरच्याला ते खोटे असल्याचे लक्षात येते परंतु चांगले वागणूक लोकांना प्रभावित करते. सौजन्य, संभाषणाचे योग्य विषय, काही कारणास्तव मदत करणे ही चांगली छाप सोडतात. तुम्ही आनंददायी असल्याने ते देखील अधिक प्रभावी वाटते तसेच ईश्वराने बोलण्याचा गुण फक्त मानवालाच दिला आहे. जगात जी परिवर्तने झाली ती बोलणाऱ्या लोकांनीच केली तसेच जो अधिक चांगला बोलतो तो यशस्वी होतो. चांगल्या वक्तृत्वासाठी वाचन व निरीक्षण आवश्यक आहे तसेच चांगली पुस्तके वाचणे व चांगली भाषणे ऐकणे गरजेचे असून तुमच्या शब्दांमध्ये ताकद असायला हवी. “टोस्टमास्टर्स क्लब” अशा व्यासपिठामुळे भविष्यातील यशस्वी नेतृत्व घडविण्यासाठी महत्वाच्या असतात मुळात वक्तृत्वातूनच नेतृत्व घडते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील टोस्टमास्टर्स क्लब हा उत्तर महाराष्ट्रामधील पहिला “चार्टर्ड” दर्जा प्राप्त असा क्लब आहे. या क्लबची धुरा सांभाळण्यासाठी कार्यकारिणी समिती नेमण्यात आली आहे. वर्ष २०२३-२०२४ मधील कार्यकारणीत व्हाईस प्रेसिडेंट ईश्वरी नेमाडे यांच्या सोबत कौस्तुभ चौधरी, भाविका घाटे, स्वप्नील शरावणे, मोईन शेख यांचा समावेश आहे. ह्या क्लबची नवीन सभासद नोंदणी सुरु असून सभासदांसोबत क्लबचे कामकाज सुरु झाले आहे, महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचा असाच उदंड प्रतिसाद मिळत राहील अशी अपेक्षा कार्यकारणीने व्यक्त केली आहे. जास्तीत जास्त विध्यार्थ्यापर्यंत पोहचणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी. एच. रायसोनी महाविध्यालयामधील टोस्टमास्टर्स अविरत कार्य करत असल्याचे कार्यकारणीने म्हटले आहे. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन टोस्टमास्टर्स क्लबच्या मेंटर प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले तर साक्षी पोहाणी या विध्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. टोस्टमास्टर्स क्लबला “चार्टर्ड” दर्जा प्राप्त झाल्याने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालक श्री.श्रेयसजी रायसोनी यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment