Posts

Showing posts from September, 2023

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत काम ; गणपतीचे निर्माल्य संकलन करून विघटन

Image
मेहरूण तलाव येथील गणपती विसर्जनस्थळी राबविला स्तुत्य उपक्रम   ;  विध्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक   जळगाव ,  ता. ३० :   जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट   क्लब व जळगाव महानगरपालिके तर्फे गणेशोत्सवात ‘ निर्माल्य संकलन व विघटन ’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले. गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले , दुर्वा , फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून या उपक्रमामुळे निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक हे ,  बरोबर आणलेली व पूजेसाठी वापरलेली फुले ,  दुर्वा ,  फुलांचे हार ,  सत्यन...

विद्यार्थी, पालक व शिक्षक या तिघांच्या समन्वयातूनच शैक्षणिक विकास शक्य : प्रा. सोनल तिवारी

Image
जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात अकरावी , बारावी पालक-शिक्षक   सभा   संपन्न जळगाव ,  ता. ३० : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी , बारावी विभागात प्राध्यापक-पालक   सभा   उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी ,  प्राध्यापकवृंद तसेच अकरावी , बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे   पालक   मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात शिक्षक प्रियांका मल व संदीप पाटील यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.   यानंतर प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी अकरावी , बारावी वर्गातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सायन्स व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच शिक्षकांसोबत   पालकांची त्या...

विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान व ते वापरण्याचे कौशल्य उत्तमरीत्या वाढविण्यासाठी “‘पिनॅकल” सारखे महोत्सव आवश्‍यक : प्रा. डॉ. विशाल जोशी

Image
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविध्यालयात ‘ पिनॅकल ’ महोत्सवाचे दोन दिवसीय भव्य आयोजन जळगाव, ता. २७ :   “ ‘ पिनॅकल” सारखे व्यासपीठ विध्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे कारण आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असून एआय, मशीन लर्निग, ब्लॉगचेन टेक्नोलॉजीच्या जगात क्रिएटीव्हीटी, क्रिटीकल थिंकीग, प्रोब्लेम सोल्विंग अॅप्रोच हे विविध स्कील विध्यार्थ्यामध्ये आलेच पाहिजे, तसेच “ ‘ पिनॅकल” सारख्या विविध इव्हेट्समधून नक्कीच विध्यार्थ्यांचे स्कील डेव्हलप व्हायला मदत होईल. तसेच रायसोनी महाविद्यालयात अकॅडमीक सोबतच “ ‘ पिनॅकल” सारख्या या राष्ट्रीय व्यासपीठाला महत्व दिले या गोष्टीचा फार आनंद वाटला असे मत पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रा. लि.चे ट्रेनीग अॅन्ड सर्टीफिकेशन हेड प्रा.डॉ. विशाल जोशी यांनी व्यक्त केले.   येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात दोन दिवसीय सुरु असलेल्या माहिती , तंत्रज्ञान , संगणक व विज्ञानाशी निगडीत आंतरराष्ट्रीय “ पिनॅकल-२०२३ ”   या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रा...

जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे बास्केटबॉल स्पर्धेत यश

Image
जळगाव ,   ता. २७ : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील बास्केटबॉल संघाने जळगाव जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेते पद मिळविले. या स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय ,   महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक २४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी चालू होते. १९ वर्ष वयोगट मुले या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. यात प्रथम सामना हा  पी. ओ. नाहाटा महाविदयालय ,   भुसावळ या संघाचा २.७ तर तर दि.श.पाटील महाविद्यालय एरंडोल या संघाचा १०.४ ने पराभव करत अंतिम फेरी गाठून जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचा संघ उपविजयी ठरला. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी ,   संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल ,   अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर क्रीडा ...

जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा संघ "प्रथम"

Image
आंतरशालेय १४ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत यश ; स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले विजेत्यांचे कौतुक जळगाव , ता. २६ : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शहरातील कांताई सभागृहात झालेल्या १४ व्या ज्युनिअर ‎ रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जी . एच . रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी . एच . रायसोनी पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात ‎ प्रथम ‎ क्रमांक प टकावला. यावेळी विजयी संघामध्ये ‎ गीत जैन , विधी सोनी , पेहेल गद्या , संजम चाबडा , तान्या चतरानी , लबडी पांगरिया , तस्नीम बदामिया या ‎ खेळाडूंचा समावेश होता .  या अनुशंगाने विजयी ठरलेल्या विद्यार्थिनीचा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन करत   जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक मंडळ , सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे विध्यार्थ्यानी घेतलेली मेहनत , त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शणामुळेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झा...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेट महाविद्यालयातील “गणरायाला भव्य मिरवणुकीने निरोप”

Image
संचालक श्री. प्रितमजी रायसोनी याच्या हस्ते श्री. गणेशाची आरती  ;  विध्यार्थ्यांच्या ढोलपथकाने परिसर गजबजला जळगाव ,  ता. २५ : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात असंख्य विध्यार्थी भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी ,  विद्युत रोषणाईने सजलेल्या रथातून जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या गणरायाला सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अभियांत्रिकी इमारतीच्या परिसरात सात दिवसापूर्वी गणरायाची भक्तिभावात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या स्थळी रोज गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी ,  संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल ,  अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत ,  जी. एच. रायसोनी कनिष्ट महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी ,  प्राध्यापक ,  प्रध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्याच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सजवलेल्या रथात विराजमान झालेल्...

जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे फुटबॉल स्पर्धेत यश

Image
जळगाव , ता. २३ : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील फुटबॉल संघाने जळगाव जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेते पद मिळविले. या स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक १८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी चालू होते. १९ वर्ष वयोगट मुले या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. यात प्रथम सामना हा डी.डी.एस.जी.पी. कॉलेज चोपडा या संघाचा २-० तर तर उपांत्य फेरीमध्ये इंदिराबाई ललवाणी कॉलेज , जामनेर या संघाचा १-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठून जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचा संघ उपविजयी ठरला. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी , संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर क्रीडा विभागाचे प्रमुख जयंत जाधव व क्रीडा ...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविध्यालयात “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” स्पर्धेचे आयोजन

Image
यावर्षी देखील “ प्रथम ” येण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निश्चय ; महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धेची निवड फेरी आयोजित जळगाव , ता. २२ :  राष्ट्रीय स्तरावरील ‘ स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम महाविद्यालयीन स्तरावर ‘ हॅकेथॉन ’ आयोजित करावी. त्यातून काही प्रस्ताव निवडून त्यांचे सादरीकरण करा , असा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतल्यानुसार जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन कल्पना व निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ता. २२ गुरुवार रोजी “ राष्ट्रीय हॅकेथॉन-२०२३ ” या स्पर्धेची निवड फेरी महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कला व मानव्यविद्या प्रशाळेचे नवनियुक्त संचालक डॉ.राम भावसार यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या प...

एकाग्रता आणि स्मरणशक्ती हिच ‘यशाची गुरुकिल्ली’ : मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ तणावमुक्त अभ्यास , सातत्य आणि एकाग्रता ” या विषयावर कार्यशाळा ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग   जळगाव , ता. २१ : एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘ यशाची गुरुकिल्ली ’ असे म्हणतात. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन , ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी , झोपेत जे ऐकतो , पाहातो , वाचतो , स्पर्श करतो , गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम यांनी केले. येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील करियर काउंसलिंग अंड पर्सनैलिटी डेवलपमेंट सेल यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित “ तणावमुक्त अभ्यास , सातत्य आणि एकाग...

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविध्यालयात 'श्री गणेशाचे' जल्लोषात स्वागत

Image
विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पासाठी बनवला 'चांद्रयान ३'चा देखावा जळगाव, ता. १९ : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणरायाची स्थापना रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री.प्रितमजी रायसोनी यांच्या हस्ते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात करण्यात आली. पाचशेहून अधिक विध्यार्थ्यानी मिरवणुकीत सहभागी होत ढोलताशांच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणपतीची स्थापना करण्यात आली. या गणेशोत्सवात स्टुडन्ट कौन्सिलच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पासाठी "चांद्रयान ३"चा देखावा साकारला असून यासाठी गौतम पांडे, रिया तळेले, भाविका घाटे, तुषार पाटील, यशराज पाटील,रोहित मराठे, कन्हैया चौधरी, प्रज्वल वाकुलकर या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली असून दहा दिवस विविध स्पर्धांचे आयोजन महाविध्यालयात केले जाणार आहे. ढोलताशाच्या गजरात बाप्पाची मि...