जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविध्यालयात 'श्री गणेशाचे' जल्लोषात स्वागत
विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पासाठी बनवला 'चांद्रयान ३'चा देखावा
जळगाव, ता. १९ : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणरायाची स्थापना रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री.प्रितमजी रायसोनी यांच्या हस्ते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात करण्यात आली. पाचशेहून अधिक विध्यार्थ्यानी मिरवणुकीत सहभागी होत ढोलताशांच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणपतीची स्थापना करण्यात आली. या गणेशोत्सवात स्टुडन्ट कौन्सिलच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पासाठी "चांद्रयान ३"चा देखावा साकारला असून यासाठी गौतम पांडे, रिया तळेले, भाविका घाटे, तुषार पाटील, यशराज पाटील,रोहित मराठे, कन्हैया चौधरी, प्रज्वल वाकुलकर या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली असून दहा दिवस विविध स्पर्धांचे आयोजन महाविध्यालयात केले जाणार आहे. ढोलताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. याप्रसंगी रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ट महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment