जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे बास्केटबॉल स्पर्धेत यश


जळगाव, ता. २७ : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील बास्केटबॉल संघाने जळगाव जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेते पद मिळविले. या स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक २४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी चालू होते. १९ वर्ष वयोगट मुले या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. यात प्रथम सामना हा  पी. ओ. नाहाटा महाविदयालय, भुसावळ या संघाचा २.७ तर तर दि.श.पाटील महाविद्यालय एरंडोल या संघाचा १०.४ ने पराभव करत अंतिम फेरी गाठून जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचा संघ उपविजयी ठरला. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर क्रीडा विभागाचे प्रमुख जयंत जाधव व क्रीडा शिक्षक राहुल धुळणकर यांचे संघातील सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश