जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत काम ; गणपतीचे निर्माल्य संकलन करून विघटन

मेहरूण तलाव येथील गणपती विसर्जनस्थळी राबविला स्तुत्य उपक्रम विध्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक

 

जळगावता. ३० :  जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट क्लब व जळगाव महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवात निर्माल्य संकलन व विघटनहा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले.

गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले, दुर्वा, फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून या उपक्रमामुळे निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक हेबरोबर आणलेली व पूजेसाठी वापरलेली फुलेदुर्वाफुलांचे हारसत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबेउदबत्याकापूर सोबत आणून विसर्जन स्थळीच वाहतात. त्यामुळे हे जलप्रदूषण रोखण्यासाठी या सर्व संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येत असून तयार केलेले खत हे रोपवाटिकेसाठी वापरले जाते. हा उपक्रम राजेश्वरी पवार, जयश्री पवार, कल्पेश महाजन, संदेश गवळी, यश जैन, निशांत कदम, निखील मिस्त्री, सिद्धेश अहिरे, अक्षय गवई, ललित पाटील, जयेश राठोड, हेमंत कोळी, हेमंत चौधरी, दिव्या जैन, सैजल परदेशी, प्रियांका शर्मा, सैजल बाहेती, दिव्या छाजेड, अक्षय घुगे, सुशांत लोहार आदी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी राबविला तर या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तर प्रा. विशाल राणा, प्रा. मुकेश अहिरराव, प्रा. अश्विनी बोंडे यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश