विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान व ते वापरण्याचे कौशल्य उत्तमरीत्या वाढविण्यासाठी “‘पिनॅकल” सारखे महोत्सव आवश्‍यक : प्रा. डॉ. विशाल जोशी

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविध्यालयात पिनॅकलमहोत्सवाचे दोन दिवसीय भव्य आयोजन

जळगाव, ता. २७ : पिनॅकल” सारखे व्यासपीठ विध्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे कारण आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असून एआय, मशीन लर्निग, ब्लॉगचेन टेक्नोलॉजीच्या जगात क्रिएटीव्हीटी, क्रिटीकल थिंकीग, प्रोब्लेम सोल्विंग अॅप्रोच हे विविध स्कील विध्यार्थ्यामध्ये आलेच पाहिजे, तसेच “पिनॅकल” सारख्या विविध इव्हेट्समधून नक्कीच विध्यार्थ्यांचे स्कील डेव्हलप व्हायला मदत होईल. तसेच रायसोनी महाविद्यालयात अकॅडमीक सोबतच “पिनॅकल” सारख्या या राष्ट्रीय व्यासपीठाला महत्व दिले या गोष्टीचा फार आनंद वाटला असे मत पॅसेंजर ड्रोन रिसर्च प्रा. लि.चे ट्रेनीग अॅन्ड सर्टीफिकेशन हेड प्रा.डॉ. विशाल जोशी यांनी व्यक्त केले. 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात दोन दिवसीय सुरु असलेल्या माहिती, तंत्रज्ञान, संगणक व विज्ञानाशी निगडीत आंतरराष्ट्रीय पिनॅकल-२०२३  या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, पिनॅकल समन्वयक व एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख तसेच बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे उपस्थित होते. सदर उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पिनॅकलस्पर्धेत सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत आयोजन कार्यक्रमातील सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक व विध्यार्थ्याचे कौतुक केले तसेच प्रायोगिक स्तरावरील संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते  संशोधन न करता नवनिर्मिती करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. तसेच मेक इन इंडियासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सतत इनोव्हेटिव्ह कार्य केले पाहिजे असे आवाहन संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी येथे केले. दोन दिवसीय सुरु असलेल्या या माहिती व तंत्रज्ञानावर आधारित पिनॅकल-२०२३ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रश्नमंजुषा, संशोधन पेपर सादरीकरण, मनोरंजन व एकाग्रता वाढविण्यासाठी संगणक गेमिंग, पोस्टर्स प्रेझेंटेशन, सीप्लसप्लस प्रोग्रामिंग स्पर्धा पार पडल्यात. यात आयटी क्विज १२००, गेमिंग ६०, संशोधन पेपर ६०, पोस्टर्स प्रेझेंटेशन १५० व सीप्लसप्लस प्रोग्रामिंग मध्ये ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. संशोधन विषयात जीएसटी, डिजिटल इंडिया, कॅशलेस सोसायटी, जिओ प्रभाव, आयओटी या प्रमुख विषयांसह आदी विषय सादर करण्यात आलेत. या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात बाबा मोटर्सचे संचालक सोहेल मलिक  हे उपस्थित होते. तसेच सदर स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी झालेल्या अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाचा यावेळी सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन आहुजा, हर्षदा पाटील व गोविंद मंधान यांनी केले तर स्पर्धा यशस्वितेसाठी पिनॅकल समन्वयक व एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा. प्रा.रुपाली ढाके, प्रा.विनोद महाजन, प्रा.करिष्मा चौधरी, प्रा.हर्षिता तलरेजा, प्रा.ऐश्वर्या परदेशी, प्रा.मनीषा राजपूत, प्रा.कविता भंगाळे, प्रा.मानसी तळेले यांनी सहकार्य केले.

असा लागला निकाल

आय टी क्विझ या स्पर्धेत प्रथम- विशाल रविंद इंगळे, अविनाश धनराज जाधव द्वितीय- ओम डी. सुर्वे, प्रेम ए. राठोड तृतीय- अविनाश राठोड, दर्पण शर्मा उत्तेजनार्थ दीपिका के महाजन, साक्षी ए. पाटील एन.एफ.एस.गेमिंगमध्ये प्रथम- रोहन शेलार द्वितीय- निशांत शेंदाने, तृतीय चिन्मय पाटील, एमएम गेमिंगमध्ये प्रथम– अश्विन पवारद्वितीय कुश किंद्रानेतृतीय जयदीप पाटील सीएस गेमिंगमध्ये प्रथम – पियुष हसवाणी, अनुज अडवाणी, मोहित दहारा, भूषण महाजन, अनिकेत राणे (UG)पोस्टर प्रेझेटेशनमध्ये प्रथम- साक्षी पाटील, शुभांगी टाकरे,आशिष तीर्मले द्वितीय- घनश्याम पाटीलऋतुजा पाटील तृतीय प्रशांत येवले, कगेश खरच (PG)पोस्टर प्रेझेटेशनमध्ये प्रथम- विवेक पाटील, गणेश पाटील, द्वितीय- मोहिनी दबोबी, दिपाली सावदेकर, साहिल खाटिक, तृतीय जागृती जधवांनी, कुणाल शर्मा, गौरव शर्मा  सी. प्लस. प्लसमध्ये प्रथम- प्रशांत शांताराम पाटीलद्वितीय- विश्वेश संदीप गंगाडेतृतीय- राजेश्वर रवींद्र जावा क़्विजमध्ये प्रथम- साहिल शेखद्वितीय- हरीश चौधरीतृतीय- राजेश्वर रवींद्र सी.एस. एस. डिझाईनमध्ये प्रथम- आकांश सराफद्वितीय- चिन्मया कोल्हेतृतीय- मोहम्मद इमरान मोहम्मद हुसेन कच्छी उत्तेजनार्थ विशाल पवार यांना अनुक्रमे स्मृतिचिन्हप्रमाणपत्र व रोख रक्कम या प्रमाणे परितोषिक देण्यात आले. तसेच यावेळी मोस्ट व्हेल्युबल प्लेयर हे पारितोषिक प्रज्वल भंगाळे या विध्यार्थ्याला देण्यात आले

 

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

नवल कुकडे – झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे

स्पर्धेत खूप काही शिकायला मिळाले. नाविन्यता पूर्वक संकल्पना अभ्यासायला मिळाल्यात. अश्या स्पर्धामुळेच विद्यार्थ्यांना गती मिळते. येथील व्यवस्थापन खूप चांगले होतेस्पर्धा अतिशय नियोजनबद्ध झाली.

 

चिन्मया भूषण कोल्हे शासकीय तंत्रनिकेतन महाविध्यालय, जळगाव 

पिनॅकल स्पर्धेमुळे आमच्या सारख्या विध्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळतेया स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या टीमने सृजनशील व आजच्या जगाला उपयोगी पडेल असे प्रात्याक्षिक येथे मांडले होते 

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश