Posts

Showing posts from July, 2023

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात कार्यशाळा

Image
प्रशिक्षित तज्ञ निलेश वाघ यांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन जळगाव , ता.३१ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने "औद्योगिक ऑटोमेशनवर लीन स्टार्ट-अप आणि किमान व्यवहार्य उत्पादन/व्यवसाय- बूट कॅम्प" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत इलेक्ट्रोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश वाघ यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्या विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत त्यांनी त्यांच्या सध्याच्या प्रकल्पाबद्दल चर्चा केली तसेच  विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप आणि उद्योजक कौशल्य विकासाशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करत , स्टार्ट-अपसाठी उष्मायन सुविधा आणि सरकारी प्रोत्साहन योजनांबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच डेमो प्रॅक्टिकल देऊन सर पीएलसी प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रा.मनिष महाले , प्रा. मधुर चौहान व प्रा. प्रियंका गजरे यांनी सहकार्य केले. तर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख ...

लिंक्डइन, एआय व चॅटजीपीटीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयात कार्यशाळा

Image
जर्मनी येथील प्रशिक्षित तज्ञ सुदर्श कटारिया याचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन जळगाव , ता. २७ : मित्र आणि जनसंपर्क ही सोशल नेटवर्किंग साइट्सची ताकद आणि हाच त्यांचा गाभा. सध्याच्या घडीला जगभरात ३०० पेक्षा जास्त सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स अस्तित्वात आहेत. यामध्ये व्हिडीओ शेअरिंग , फोटो शेअरिंग , म्युझिक शेअरिंग , ब्लॉगिंग अशा सगळ्याच प्रकारांचा समावेश होतो. मात्र शुद्ध आणि फक्त नौकरी व व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी अस्तित्वात असणारी लिंक्डइन ही एकमात्र वेबसाइट आहे. मागच्या दशकात जेव्हा माध्यमांचं रूपडं बदलत होतं आणि समाज माध्यमांचा विस्तार होत होता त्याच काळात लिंक्डइनचा जन्म झाला. व्यावसायिक जगतात ह्य़ा वेबसाइटवरची अपटूडेट प्रोफाइल महत्त्वाची ठरते असे प्रतिपादन द फायनल अॅडव्हाइस डॉट कॉमचे सह-संस्थापक व भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनी आणि ब्रिटनमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी सहकार्य करणारे सुदर्शन रजनीश कटारिया यांनी ता. २७ गुरुवार रोजी शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात केले. लघु उद्योग भारती व जितो यांच्या संयुक्त विध्यमानाने “ लिं...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न

Image
जिल्हा पोलीस जलतरण संघाची बाजी ; संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या हस्ते बक्षीस वितरण जळगाव , ता.२४ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या सयुंक्त विद्यमाने ता. २३ रविवार रोजी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मिनी ऑलम्पिक जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप – २०२३ या लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत सांघिक गटात जळगाव जिल्हा पोलीस जलतरण तलाव संघाने बाजी मारुन विजेतेपद पटकावले तर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने उपविजेतेपद तसेच तृतीयस्थानी अ‍ॅक्वा स्पा हा संघ विजयी ठरला. जळगाव जिल्हा विभागातून या स्पर्धेत ११० जलतरणपटू सहभागी झाले होते. जळगाव शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल आयोजित जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप – २०२३ ही जलतरण स्पर्धा दोन सत्रांमध्ये खेळविण्यात आली. फ्रि स्टाईल , बॅक स्ट्रोक , बटर फ्लाय ब्रेस्ट्रोक , वैयक्तिक मिडले , सांघिक मिडले अशा सहा प्रकारांत झालेल्या या स्पर्धेत ६ ते १७ वर्षांखालील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी समारोप कार्यक्रम...

“जी. एच. रायसोनी मेमोरियल राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धे”त पुण्याचा विरेश शरणार्थी विजेता

Image
पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बक्षीस वितरण ; विजेत्यांना तब्बल ७२ हजार रकमेची रोख पारितोषिके व चषक वितरीत जळगाव , ता. २३ :  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय नेहमी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना , महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ता. २० ते २३ जुलै दरम्यान पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा विरेश शरणार्थी प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला तर अन्य विजेत्यांमध्ये द्वितीय प्रियांषु पाटील(नागपूर), तृतीय ओम लामखाने(पुणे) तर अनुक्रमे मानस गायकवाड( सोलापूर), इंद्रजीत महेंद्रकर (औरंगाबाद), अनिकेत बापट (सातारा), किरण पंडितराव(पुणे) कार्तिक कुमारसिंग( नाशिक), मिहीर सरवदे(पुणे) योहान बोरीचा(मुंबई)  यांचा समावेश आहे. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २०० खेळाडू सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना जळगाव पोल...

जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्य फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत ५.५ गुणांसह प्रियांशू पाटील नागपूर, वीरेश शरणार्थी पुणे, मानस गायकवाड सोलापूर,ओमल मकाने पुणे, अनिकेत बापट सातारा आघाडीवर

Image
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांची स्पर्धेला भेट ;  बक्षीस वितरण समारंभ उद्या जळगाव , ता. २० :   जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट  महाविद्यालय व  जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य  फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या तिसऱ्या दिवशी सहाव्या फेरी अखेर सहा गुणांसह  प्रियांशू पाटील नागपूर , वीरेश शरणार्थी पुणे , मानस गायकवाड सोलापूर , ओमल मकाने पुणे , अनिकेत बापट सातारा हे आघाडीवर आहेत. तर पाच गुणांवर आशिष चौधरी अहमदनगर , आदित्य सावळकर कोल्हापूर , कार्तिक सिंग नाशिक , अर्णव कोळी ठाणे , गणेश ताजने नाशिक आपले आव्हान टिकुवन आहेत. सदर स्पर्धा शिरसोली मार्गावरील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात  २० ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली असून  सहाव्या फेरीची सुरुवात  जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी  यांच्या हस्ते करण्यात आली. सोबत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया , स्वप्निल बनसोड प्रवीण ठाकरे , क्रीडा संचा...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे रविवारी जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप - २०२३ जलतरण स्पर्धा

Image
जळगाव , ता. २१ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या सयुंक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मिनी ऑलम्पिक जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन रविवार ता. २३ रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा ६ वर्षाखालील , ११ वर्षाखालील , १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील अशा स्त्री-पुरुष वयोगटात होत असून यावेळी फ्रीस्टाईल , ब्रेस्ट स्टोक , बॅक स्ट्रोक व बटरफ्लाय या विविध प्रकारात स्पर्धा पार पडणार आहे तसेच यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी विजेत्यांना , ट्रॉफी , मेडल व स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या अध्यक्षा दीक्षिता रेवती नगरकर , उपाध्यक्ष राजेंद्र ओक , सचिव फारूक शेख व सहसचिव कमलेश नगरकर यांनी दिली. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ११० स्पर्धकांनी...

जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्य निवड फिडे बुद्धिबळ स्पर्धेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

Image
विविध जिल्ह्यातील २०० खेळाडू सहभागी ; जैन इरिगेशनचे अतुल जैन व रायसोनी इस्टीट्युटचे श्रेयस रायसोनी यांची प्रमुख उपस्थिती जळगाव , ता. २० :  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या हिरवाईने नटलेला परिसर , प्रशस्त सभागृह , राज्यभरातील दिग्गज व उदयोन्मुख खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा सहभागात गुरुवारी फिडे नामांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यातील २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल व रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी यांच्यातील प्रातिनिधिक लढतीने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना , महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा शिरसोली मार्गावरील जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या प्रशस्त भवनात ता. २० ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. ता. २० गुरुवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा...

रायसोनी महाविद्यालयात २० ते २३ जुलै दरम्यान “जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र राज्य निवड फिडे बुद्धिबळ स्पर्धे”चे आयोजन

Image
विविध जिल्ह्यातून खेळाडू होणार सहभागी ; तब्बल ७२ हजार रकमेची रोख पारितोषिके व चषक होणार विजेत्यांना वितरीत जळगाव , ता.१७ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय नेहमी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना , महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने जळगाव शहरात ता. २० ते २३ जुलै दरम्यान “ जी. एच. रायसोनी मेमोरियल खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा ” आयोजित करण्यात आल्या आहे. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या सेमिनार हॉलमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत. अशी माहिती रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी , संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया , जैन स्पोर्ट अकॅडमीचे अरविंद देशपांडे , रवींद्र धर्माधिकारी व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण ठाकरे यांनी सोमवारी रायसोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली...