“जी. एच. रायसोनी मेमोरियल राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धे”त पुण्याचा विरेश शरणार्थी विजेता

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बक्षीस वितरण ; विजेत्यांना तब्बल ७२ हजार रकमेची रोख पारितोषिके व चषक वितरीत

जळगाव, ता. २३ :  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय नेहमी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते या अनुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ता. २० ते २३ जुलै दरम्यान पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा विरेश शरणार्थी प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला तर अन्य विजेत्यांमध्ये द्वितीय प्रियांषु पाटील(नागपूर), तृतीय ओम लामखाने(पुणे) तर अनुक्रमे मानस गायकवाड( सोलापूर), इंद्रजीत महेंद्रकर (औरंगाबाद), अनिकेत बापट (सातारा), किरण पंडितराव(पुणे) कार्तिक कुमारसिंग( नाशिक), मिहीर सरवदे(पुणे) योहान बोरीचा(मुंबई)  यांचा समावेश आहे. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २०० खेळाडू सहभागी झाले होते.

समारोप कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना जळगाव पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जळगाव पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी बुद्धिबळ या खेळात मनुष्याच्या मेंदूचा मोठा वापर होतो. बौध्दीक क्षमतांना वृध्दींगत करण्यासाठी तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर रणनिती आखण्यासाठी बुद्धिबळ सहाय्यभूत ठरत असल्याने सर्वांनी बुद्धिबळ खेळावे, तसेच या स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे बुद्धीच्या विकासाबरोबर एकाग्रता वाढते व या माध्यमातून आपल्या आयुष्याच्या पटलावर निश्चितपणे यशस्वी होता येते तसेच या स्पर्धेसाठी या ठिकाणी खेळाडू सोबत त्यांचे पालक देखील आले आहे मुलांनी या गोष्टीचे भान ठेवावे की त्यांचे पालक त्यांच्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. खेळाडूंनी देखील परिश्रम घ्यावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सदर स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कामगिरी बजावलेले स्वप्नील बनसोड, सहाय्यक पंच प्रवीण ठाकरे, पोर्णिमा माने, अभिषेक जाधव, सागर साखरे, वासंती सरवडे यांनी जबाबदारी सांभाळली तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रायसोनी महाविद्यालयाचे जयंत जाधव, राहुल धुळनकर, ममता प्रजापत यांनी तर जैन स्पोर्ट अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दिक्षित सहकार्य केले. या स्पर्धेत वय वर्ष सहा ते 70 वर्षांपर्यंतच्या खेळाडूंसह १२५ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा समावेश होता. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी यांनी केले. 

 

यशस्वीतांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह

स्पर्धेतील गटनिहाय विजेते असे : १५ वर्षांखालील गट : हर्ष गाडगे( अहमदनगर), ओजस देवोशतार(पुणे), अय्या आयुष उमेश(अहमदनगर),

१३ वर्षांखालील गट : अर्णव महेश कोळी(ठाणे), ईशान रॉय(मुंबई), शेर्ला प्रथमेश(पुणे),

११ वर्षांखालील गट : आर्यन अमोल वाघमारे(ठाणे), प्रतिक ललित तांबी(अमरावती), कश्यप ब्रिजेश कांकरिया( सांगली),

9 वर्षांखालील गट : विहान अनुपम अग्रवाल(मुंबई), भूमिका वागले(संभाजीनगर), निदयूष आनंद(ठाणे)

वर्षांखालील गट : नारायणी उमेश मराठे (नंदुरबार), हार्दिक रावलानी (जळगाव)    

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश