जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे रविवारी जिल्हास्तरीय एक्वाटिक चॅम्पियनशिप - २०२३ जलतरण स्पर्धा
जळगाव,ता. २१ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या सयुंक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मिनी ऑलम्पिक जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन रविवार ता. २३ रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ६ वर्षाखालील, ११ वर्षाखालील, १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील अशा स्त्री-पुरुष वयोगटात होत असून यावेळी फ्रीस्टाईल, ब्रेस्ट स्टोक, बॅक स्ट्रोक व बटरफ्लाय या विविध प्रकारात स्पर्धा पार पडणार आहे तसेच यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी विजेत्यांना, ट्रॉफी, मेडल व स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रीक्टच्या अध्यक्षा दीक्षिता रेवती नगरकर, उपाध्यक्ष राजेंद्र ओक, सचिव फारूक शेख व सहसचिव कमलेश नगरकर यांनी दिली. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ११० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
Comments
Post a Comment