जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात कार्यशाळा

प्रशिक्षित तज्ञ निलेश वाघ यांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

जळगाव, ता.३१ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने "औद्योगिक ऑटोमेशनवर लीन स्टार्ट-अप आणि किमान व्यवहार्य उत्पादन/व्यवसाय- बूट कॅम्प" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत इलेक्ट्रोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश वाघ यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्या विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत त्यांनी त्यांच्या सध्याच्या प्रकल्पाबद्दल चर्चा केली तसेच  विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप आणि उद्योजक कौशल्य विकासाशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करत, स्टार्ट-अपसाठी उष्मायन सुविधा आणि सरकारी प्रोत्साहन योजनांबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच डेमो प्रॅक्टिकल देऊन सर पीएलसी प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रा.मनिष महाले, प्रा. मधुर चौहान व प्रा. प्रियंका गजरे यांनी सहकार्य केले. तर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.बिपासा पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश