लिंक्डइन, एआय व चॅटजीपीटीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयात कार्यशाळा
जर्मनी येथील प्रशिक्षित तज्ञ सुदर्श कटारिया याचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन
जळगाव, ता. २७ : मित्र आणि जनसंपर्क ही सोशल नेटवर्किंग साइट्सची ताकद आणि हाच त्यांचा गाभा. सध्याच्या घडीला जगभरात ३०० पेक्षा जास्त सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स अस्तित्वात आहेत. यामध्ये व्हिडीओ शेअरिंग, फोटो शेअरिंग, म्युझिक शेअरिंग, ब्लॉगिंग अशा सगळ्याच प्रकारांचा समावेश होतो. मात्र शुद्ध आणि फक्त नौकरी व व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी अस्तित्वात असणारी लिंक्डइन ही एकमात्र वेबसाइट आहे. मागच्या दशकात जेव्हा माध्यमांचं रूपडं बदलत होतं आणि समाज माध्यमांचा विस्तार होत होता त्याच काळात लिंक्डइनचा जन्म झाला. व्यावसायिक जगतात ह्य़ा वेबसाइटवरची अपटूडेट प्रोफाइल महत्त्वाची ठरते असे प्रतिपादन द फायनल अॅडव्हाइस डॉट कॉमचे सह-संस्थापक व भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनी आणि ब्रिटनमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी सहकार्य करणारे सुदर्शन रजनीश कटारिया यांनी ता. २७ गुरुवार रोजी शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात केले. लघु उद्योग भारती व जितो यांच्या संयुक्त विध्यमानाने “लिंक्डइन, एआय व चॅटजीपीटीचा प्रभावी वापर कसा करता येईल”या शीर्षकाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, लघु उद्योग भारती जळगावचे अध्यक्ष प्रमोद संचेती, सेक्रेटरी भरत पाटील, जितो ऑर्गनायझेशनचे हरक सोनी व बीबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सुदर्श कटारिया यांनी विध्यार्थ्यांना लिंक्डइनचे काही प्रभावी गोल्डन रुल्स सांगितले ते असे कि,·
लिंक्डइनवर अॅचीवमेंट, प्रोजेक्ट,
फीडबॅक
तसेच चालू आणि पूर्वीची नोकरी, जॉब टायटल,
कंपनी,
क्षेत्र,
तारखा
आणि नोकरीविषयीची माहिती भरावी
·
आपल्या नौकरी व व्यवसायात नेटवर्कीग वाढविण्यासाठी लिंक्डइनचा
पुरेपूर उपयोग करावा
·
लिंक्डइनवर स्वताला सेल न करता स्वताची ब्रंॅडीग करावी
·
लिंक्डइनवर आपली प्रोफाईल रिच ठेवावी जेणेकरून सदैव आपल्याला त्याचा
फायदा होईल.
· लिंक्डइनमध्ये जास्तीत जास्त स्पेसचा वापर करावा तसेच आर्टिकुलेट व डू नॉट मैनिपुलेट
चॅटजीपीटी एक अभिनव तंत्रज्ञान
(महत्वाचे फायदे)
·
भाषांतर: चॅटजीपीटी मुलांना, विद्यार्थ्यांना,
व्यावसायिकांना
आणि सामान्य जनतेला कोणत्याही भाषेत त्वरित भाषांतर करण्याची सुविधा देते.
·
संचार: चॅटजीपीटी युजरना संचाराच्या साधनांसह त्वरित संवाद साधू
शकते.
·
शिक्षण: चॅटजीपीटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करू शकते,
त्यात
लहान मुलांना आणि युवकांना शिक्षण मिळावा, स्कूल विषयांवरील प्रश्नांची सोय.
·
माहिती: चॅटजीपीटी विविध माहिती देण्यात मदत करू शकते,
उदाहरणार्थ,
खेळ,
टेक्नॉलॉजी,
संगीत
आणि सिनेमा.
·
सहाय्य: चॅटजीपीटी लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करू शकते,
उदाहरणार्थ,
आरोग्य
संबंधित समस्या निवारण.
असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी विध्यार्थ्यांना केले. सदर कार्यशाळेचे प्रा. ज्योती जाखेटे यांनी सूत्रसंचालन केले तर या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सोनल पाटील व प्रा कल्याणी नेवे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच यावेळी प्रा. तन्मय भाले, प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. श्रेया कोगटा हे यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment