Posts

Showing posts from January, 2023

आयआयएम कलकत्ताच्या बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड

Image
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत आयआयएमचे एक्स्पर्ट यांनी केले “बिजनेस एनालिस्ट”वर मार्गदर्शन ; एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग जळगाव, ता. ३१ : आयआयएम कलकत्ताच्या ई सेलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिपची प्राथमिक फेरी २० ते २८ जानेवारी दरम्यान जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए विभागाद्वारे यशस्वीरित्या पूर्ण झाली. यावेळी बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी बिजनेस अॅनालिटिक्सची उद्दिष्टे समजून घेण्यासाठी एक ओरिएंटेशन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी एमबीए विभागातील ४१ विद्यार्थ्यांनी "बिजनेस अॅनालिटिक्स" च्या 30 तासांच्या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. या अनुषंगाने प्रसिध्द उद्योजक व आयएमएचे प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल व व्यावसायिक प्रशिक्षक नासेर घांजेनफेर यांनी विद्यार्थ्यांना बिजनेस एनालिस्टवर मार्गदर्शन केले. त्यांन...

जी. एच. रायसोनी करंडकच्या अंतिम फेरीत “कंदील” व “माय भवानी” एकांकिका

Image
२५ व २६ फेब्रुवारीला नागपूर येथे अंतिम फेरीचे आयोजन  ;  महाराष्ट्रातील विविध आंतरमहाविद्यालयीन नाट्य संघ सहभागी जळगाव ,  ता. २९ : महाविद्यालयीन युवक-युवतींनी अतिशय जोमदारपणे भाग घेतलेल्या जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या जळगाव केंद्रावर शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीत मुळजी जेठा महाविद्यालयाच्या  “ कंदील ”  व नूतन मराठा महाविद्यालयाच्या  “ माय भवानी ”  या दोन एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. जी एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील जळगाव केंद्राची प्राथमिक फेरी शनिवारी येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मोठय़ा उत्साहात पार पडली. स्पर्धेसाठी जळगाव ,  धुळे ,  नंदुरबार व नाशिक येथील अनेक महाविद्यालयांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी मुजे महाविद्यालय व नूतन मराठा महाविद्यालयातील दोन संघाच्या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. नागपू...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
जळगाव ता. २६ : जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालय व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी दीपक सैनी , माधवी घुगे , पल्लवी सुर्वे , शुभम रॉय , कार्तिक पाटील , शाहनवाज सय्यद या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना रायसोनी इस्टीट्यूटचे ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा , कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी संयुक्तिकरित्या मार्गदर्शन केले. ते यावेळी म्हणाले की , विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता , समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवाव...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात !

Image
विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे सादरीकरण ; रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांची प्रमुख उपस्थिती जळगाव , ता. २३ : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. या अनुषंगाने दरवर्षाप्रमाणे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांसाठी “ क्रीडा महोत्सवाचे ” आयोजन केले. ता. २१ व २२ जानेवारी म्हणजेच शनिवार व रविवारी रोजी हा क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. हा क्रीडा महोत्सव दोन टप्प्यात घेण्यात आला. या क्रीडा महोत्सवाच्या औपचारिक कार्यक्रमाचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या क्रीडा महोत्सवाला प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा हे उपस्थित होते. .विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्कूलचे क्रीडाशिक...

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न जळगाव , ता. १९ : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा ,  प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर आदी प्राध्यापकवृंद व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात प्रा. डॉ. अविनाश खंबायत यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी  प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सभेचे समन्वयक व प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार...

जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २८ जानेवारीला

Image
जळगाव, ता. १७ : जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे २८ जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. शिरसोली येथील जी.एच. रायसोनी इन्स्टीट्यूट अॉफ इंजीनियरींग अँड मॅनेजमेंट या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होईल. तालीम पद्धतीने प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नेपथ्य , वेशभूषा , रंगभूषेचा वापर अनिवार्य नसेल. तसेच यावेळी लाईट्स आणि लेव्हल्सही पुरविण्यात येणार नाही. ही फेरी पूर्णपणे तालीम पद्धतीने होणार आहे. स्पर्धक संघांनी संहितेच्या दोन प्रती आणि डीआरएमची पावती प्राथमिक फेरीतील प्रयोगापूर्वीच द्यायचे आहे. स्पर्धक संघाने एक तास आधी केंद्रावर रिपोर्टींग करणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा पूर्णपणे मराठी भाषेतील एकांकिकांसाठी आहे. जे कलावंत प्राथमिक फेरीत काम करतील तेच कलावंत अंतिम फेरीतही असणे अनिवार्य आहे. कलावंत बदलता येणार नाही , असे आयोजकांनी कळविले आहे. प्राथमिक फेरीत अव्वल ठरणाऱ्या तिन्ही एकांकिकांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. अंतिम फेरी २५ व ...

जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये "रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त" मार्गदर्शन

Image
फोटो ओळ: जी. एच. रायसोनी महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा अभियानमध्ये बोलताना भूषण मोरे व महाविद्यालयामधील विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग जळगाव , ता. १६ : मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये रस्ता वाहतूक सप्ताह निमित्त मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी महाविद्यालयाचे  ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भूषण मोरे व ऋषिकेश महाले उपस्थित होते. बोलताना श्री. मोरे म्हणाले कि , वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणे , अपघातास आळा घालणे , अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे , पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना आपले वाहन चालविण्याकरीता ताब्यात देवू नये. रस्ते सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असून रस्ते संदर्भातील कायदे व नियमाचे तंतोतत पालन होणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते , त्यातही डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त असते. त...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगला पतंगोत्सव

Image
“ पतंग बनवा स्पर्धे ” तून सामाजिक संदेश देत रायसोनीच्या विध्यार्थ्यानी साजरी केली मकरसंक्रांत जळगाव , ता. १४ : हीप हीप हूर्रे , कमॉन चिअर अप अशा शब्दांत स्पर्धकाला प्रोत्साहन देत , संगीताच्या तालावर जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पतंगोत्सव रंगला. रायसोनी इस्टीट्युटने आयोजित केलेल्या पतंगोत्सवातील पतंग बनवा स्पर्धेत गायत्री चावरे व विदिशा सोनावणे या विध्यार्थीनिनी बाजी मारली तर सानिका राणे हिने दुसरा क्रमांक पटकावला , तसेच तिस-या क्रमांकावर धनश्री जाधव या विद्यार्थिनीने आपले नाव कोरले. शांतता आणि आशा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या पतंगोत्सवाचा आनंद तरुणांनी तसेच त्यांच्या पालकांनीही घेतला. डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनने आयोजित केलेल्या या पतंगोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी , एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख आदींची उपस्थिती होती. यांच्याच हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पतंगोत्सव ही अनोखी संकल्पना आहे...

भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन व टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही : मिलिंद कंक

Image
स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक निमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” वर राष्ट्रीय परिषद संपन्न ; स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता.१३ : येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयात ता. १३ रोजी “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप (आयटीई-२०२२) लींडीग बिजनेस इन द न्यू नॉर्मल ” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ओरंगाबाद येथील यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कंक , रायगड येथील डीआरटी-अँथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश कासार व ग्राउंडअप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सहसंस्थापक अमेय देशपांडे हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी परिषदेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय विभागातर्फे या आठवड्यात (10 ते 16 जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या स...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Image
“ स्ट्रेंथ इज लाईफ अॅन्ड विकनेस इज डेथ " या विषयावर उद्योजक वेणुगोपाल बिर्ला यांनी विध्यार्थ्यांना दिले मोलाचे संदेश जळगाव , ता. १२ : “ राष्ट्रीय युवा दिना ” निमित्त जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयात “ शक्ती हि जीवन हे , निर्बलता मृत्यू" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल हे होते तर व्यासपीठावर ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आत्मविश्वास ( Self Confidence) म्हणजे एखाद्याच्या क्षमता , गुण आणि निर्णयावरील विश्वासाची भावना. आरोग्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाचा चांगला स्तर असणं ही बाब आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते. तसेच प्रत्ये...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उद्या “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नप्रणरशिप”वर राष्ट्रीय परिषद

Image
जळगाव , दि. १२ – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय , उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या आठवड्यात (10 ते 16 जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे असतील. स्टार्टअपशी संबंधित कार्यक्रम देशभरात अनेक ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. या अनुषंगाने १३ जानेवारी रोजी “मॅजिक अक्टीव्हिटी- माय स्कील माय बिजनेस” या विषयावर आधारित, येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” या प्रमुख विषयावर उद्या शुक्रवार ता. १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत असून  परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्यापक , रिसर्च स्कॉलर , विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनाही संशोधन सादर करता येणार आहे. आयोजित परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून रायगड येथील डीआरटी-अँथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश कासार , औरंगाबाद येथील मराठवाडा एक्स...

रायसोनी इस्टीट्यूटमध्ये “नीव” वार्षिक आनंदोत्सव दिमाखात साजरा

Image
रायसोनीच्या रंगमंचावर रंगली कलामैफल ; अविस्मरणीय कार्यक्रमाने भारावले सहकारी रसिक जळगाव , ता. १० :  जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये सहका-यांसाठी   एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अ‍ॅण्ड कल्चरल मिट म्हणजेच “नीव ” वार्षिक   आनंदोस्तव व क्रीडा सप्ताह जल्लोषात पार पडला. यावेळी नाटक , मिमिक्री , समूह गायन ,  समूह नृत्य ,  एकल नृत्य ,  व्यक्तिगत गायन ,  पारंपारिक वेशभूषा , ,  बॉलिवूड थीम ,  फॅशन शो ,  अंताक्षरी ,  काव्य वाचन ,  क्रिकेट ,  बुद्धिबळ ,  टेबल टेनिस ,   कॅरम ,  बॅटमिंटन ,  संगीत खुर्ची ,  रस्सीखेच   अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.     इस्टीट्यूटमधील   सहका-यांना कामातून मोकळीक मिळावी तसेच कामाचा तान कमी व्हावा आणि आपल्या आतील विविध कलागुणांना चालना मिळावी ,  त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा व नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी   या उद्देशाने क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल पाच दिवस जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी ,  बिजनेस ...

‘बौद्धिक संपदा’ ठरते व्यवसायात महत्त्वाची : पेटंट परीक्षक श्री. अमोल पाटील

Image
जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयात "पेटंट व बौद्धिक संपदा अधिकार" या विषयावर कार्यशाळा ; विध्यर्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता. ०५  : ' सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत नवनिर्मिती व संशोधनाचा स्पर्धात्मक लाभ घेण्यासाठी व्यावसायिक वाटचालीत ' बौद्धिक संपदा महत्त्वाची भूमिका बजावते ,' असे प्रतिपादन. मुंबईच्या इंडियन पेटंट ऑफिस येथील पेटंट परीक्षक अमोल पाटील यांनी केले. भारत सरकारने 15 ऑक्टोबर 2020 रोजी बौद्धिक संपदा साक्षरता आणि पेटंट जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाम प्रोग्राम फॉर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी साक्षरता आणि जागरुकता (कपिला) नावाची मोहीम सुरू केली आहे. या योजनेच्या उद्दिष्टांमध्ये बौद्धिक संपदा अधिकार ( IPR) बाबत जागरुकता निर्माण करणे असल्याने , राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरुकता अभियान तसेच जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विध्यमाने आयोजित राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पेटंट , ट्रेडमार्क , कॉपीराइट , ट्रेडमार्क , ट्रेड सिक...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्याची कळसुबाई शिखर मोहिम फत्ते

Image
तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत विध्यार्थ्यानी राबविली स्वच्छता मोहीम जळगाव ता. ३  : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या १९०  विध्यार्थ्यानी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. दहा तासांच्या मोहिमेत या विध्यार्थ्यानी कळसुबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. या मोहिमेत विध्यार्थ्यानी “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”, ‘ भारत माता की जय ’, वंदे मातरमच्या जयघोषात मोहिम फत्ते केली. तसेच शिखरावर चढता चढता ठिकठिकाणी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. यावेळी विध्यार्थ्यानी ऑलम्पिक विजेते खेळाडू , सीमेवर लढणारे जवान व शास्त्रज्ञाच्या कार्याला सलाम करत त्यांना मोहीम समर्पित केली. महाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. जी. एच. रायसोनी इन्स...