जी. एच. रायसोनी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

स्ट्रेंथ इज लाईफ अॅन्ड विकनेस इज डेथ " या विषयावर उद्योजक वेणुगोपाल बिर्ला यांनी विध्यार्थ्यांना दिले मोलाचे संदेश

जळगाव, ता. १२ : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयात शक्ती हि जीवन हे, निर्बलता मृत्यू" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल हे होते तर व्यासपीठावर ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आत्मविश्वास (Self Confidence) म्हणजे एखाद्याच्या क्षमता, गुण आणि निर्णयावरील विश्वासाची भावना. आरोग्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाचा चांगला स्तर असणं ही बाब आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते. तसेच प्रत्येकाने स्वताला कमी न लेखता आपली स्ट्रेंथ ओळखायला हवी व प्रोब्लेम सोल्विग अप्रोच असला पाहिजे म्हणजे कुठलीही समस्या आली म्हणजे ती तत्काळ त्याला सोडवता आली पाहिजे. तसेच जितक्याहि स्वतःमध्ये विकनेस आहे जसे कि मी खेड्या गावातला आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही अशा अनेक बाबीचा न्यूनगंड न बाळगता आपण स्वताच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी स्वताच घेवून पुढे जायला हवे म्हणजेच ध्येय, कल्पना, मेहनत यांच्या बळावर तुम्ही स्वताच्या सकारात्मक भविष्याचे शिल्पकार व्हायला हवे असे त्यांनी यावेळी नमूद करत शिस्त, कष्ट आणि आत्मविश्वास यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगितले तसेच यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व प्रसिध्द उद्योजक वेणुगोपाल बिर्ला यांनी नमूद केले कि, नवीन पिढीसाठी उद्योग क्षेत्रात करियर करण्याची मोठी संधी आहे. शासकीय योजनाच्या सहाय्याने उद्योग सुरु करू शकतात. नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे तरुणांना संधीही मिळत आहे. काळानुसार बदल होणे स्वाभाविक आहेच. युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसायात त्यांना यश नक्की मिळेल तसेच उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर व्यवसायाची मूल्य जोपासणे आवश्यक आहे. काही उद्योजकांना व्यवसायाचा कौटुंबिक वारसा लाभलेला असतो. परंतु त्यांना देखील वेळेनुसार बदल करणे आवश्यक राहते. काळानुसार बदल करण्यात आला नाही तर आपण बाहेर फेकलो जातो याची भीती त्यांनाही असते. तंत्रज्ञानातील बदल, सामाजिक बदल हे होतातच, त्यामुळे एक उद्योजक म्हणून बदल स्विकारून स्वतःला सिध्द करणे, सामाजिक प्रतिमा वाढविणे हेच यशस्वी उद्योजकाच सूत्र आहे तसेच बाजारात खूप मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे. त्यामुळे ग्राहकाची किंमत कळली पाहिजे. आपला स्पर्धक आपण स्वतःला समजा कारण आपण वस्तू विक्री करणार आहोत. सर्वच कामे झटपट होत नाहीत त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. तेवढी मेहनत घ्यावी लागते आणि महत्वाचे म्हणजे कोणतेही काम करताना ते मनापासून करा तुम्हाला यश हमखास मिळेल. आपण आपले आयुष्य कसे जगतो याच्यावर आपले ध्येय निश्चित होते. आपले ध्येऊ उंच शिखरावर पोहचायचे असेल तर तुम्ही ते ध्येय नक्की गाठणार, व्यवसाय करणार असाल तर त्यात रूढ व्हा, शिका, परिश्रम घेण्याची तयारी ठेवा आणि पुढे जा. व्यवसायात दिलेला शब्द पाळणे खूप महत्वाचे आहे. कामावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करू शकाल. युवकांनो नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा, परिचय प्रा. डॉ. योगिता पाटील तर आभार प्रा. रफिक शेख यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक व प्रध्यापकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश