भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन व टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही : मिलिंद कंक

स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक निमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपवर राष्ट्रीय परिषद संपन्न ;स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता.१३ : येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयात ता. १३ रोजी इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप (आयटीई-२०२२) लींडीग बिजनेस इन द न्यू नॉर्मलया विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ओरंगाबाद येथील यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कंक, रायगड येथील डीआरटी-अँथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश कासार व ग्राउंडअप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सहसंस्थापक अमेय देशपांडे हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी परिषदेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय विभागातर्फे या आठवड्यात (10 ते 16 जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे घेण्याचे ठरल्याने याच अनुषंगाने रायसोनी महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नप्रणरशिपया प्रमुख विषयावर विचारमंथन करण्यासाठी हि दहावी परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र आणणे हे आहे, जे विविध ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि परिषदेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करतात. ही परिषद तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणर क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकूण १५१ कॉपीराइट्स व १७ पेटंट दाखल केल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरलेले होते. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले तर समन्वयक आयआयसी तसेच रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता, प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, प्रा. डॉ. मोनाली शर्मा व प्रा. डॉ. योगिता पाटील हे होते. यशस्वीतेसाठी प्रा. तन्मय भाले, रोहित साळुंखे , प्रा. श्रीया कोगटा व आदीनी परिश्रम घेतले तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

 

थ्रीडी प्रिंटीगने केली औद्योगिक क्रांतीला सुरुवात

ग्राउंडअप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सहसंस्थापक अमेय देशपांडे यांनी आपले अनुभव कथन करत सांगितले कि फिजिक्स, केमिस्ट्रीत आवड असताना अमेय देशपांडे यानी इंजिनिअरिंगमध्येच जाण्याचे ठरविले होते. त्यानुसारते  बी. टेक. (नॅनोटेक्नॉलॉजी) झाले. शिक्षण घेत असताना त्याना थ्रीडी प्रिंटिंग विषयी माहिती झाली. शिक्षणादरम्यान सोलर सेलचे प्रोजेक्ट होते. प्राध्यापकांनी त्याचे थ्रीडी प्रिंटिंग मॉडेल तयार त्याला सांगितले होते. त्यानंतर अमेय यांनी आयआयटी मुंबई येथील निमो लॅबमध्ये स्वतः थ्रीडी प्रिंटिंग केले. यानंतर २०१८ मध्ये त्यांनी केमिस्ट्री लॅबसाठी साहित्य तयार करणाऱ्या कंपनीत एक वर्ष नोकरी केली. तेथेही त्याना थ्रीडी प्रिंटिंग शिकता आले. नोकरीदरम्यान त्यानी पैशांची बचत केली आणि २०१९ मध्ये स्वतःचे थ्रीडी प्रिंटर खरेदी केला. कोरोनामुळे लॉकडाउन लागले तेव्हा अमेय चेन्नईत होते. लॉकडाउन काळात काय करावे, हा प्रश्‍न त्याच्यासमोर होता. त्यामुळे त्यानी फेशशिल्डचे ४० ते ५० प्रकार बनविले. यासाठी त्यानी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर चर्चा केली. त्यातून एक फेसशिल्ड अंतिम केली. या फेसशिल्डचे त्यानी दहा दिवसात तीन हजार थ्रीडी प्रिंटिंग तयार केली. यात नष्ट करता येतील अशा आणि पुन्हा वापरता येतील अशा फेशशिल्ड होत्या. लॉकडाउनच्या काळात त्यानी चार मित्रांच्या मदतीने तब्बल दोन लाख फेशशिल्ड तयार केल्या. विदेशातूनही मागणी आली. त्यानी अमेरिका, जर्मनीतही ५० हजार फेशशिल्ड पाठविल्या. लॉकडाउन संपल्यानंतर अमेय औरंगाबादेत आले. २०२० मध्ये त्यानी ग्राउंड अप टेक्नॉलॉजी प्रा. लि.नावाने कंपनी नोंदणी केली. यानंतर मॅजिकच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये त्याना मार्गदर्शन मिळाले. कंपनी स्थापनेनंतर त्यानी इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या थ्रीडी प्रिंटिंगवर सर्वाधिक भर दिला. यासाठी कंपन्या त्याना फाइल देतात, त्याप्रमाणे ते थ्रीडी प्रिंटिंगमध्ये पार्ट तयार करून देतात. तसेच थ्रीडी प्रिंटरसाठी लागणाऱ्या प्लेटही ते तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.


व्यावसायीकानो मागणी तसा पुरवठा करा

रायगड येथील डीआरटी-अँथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश कासार यांनी या आठवड्यात स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह सोबतच दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी 'रस्ता सुरक्षा सप्ताह' आयोजित करत आहे. सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही तर जीवनाचा एक मार्ग असून त्यांनी यावेळी प्रत्येक दुचाकी वाहकाला हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. तसेच व्यवसायकानी ग्राहकांच्या मागणीचा अंदाज ठेवून मागणी तसा पुरवठा करा व मार्केट रिसर्चर बना असे सांगितले.

 

बिजनेसमध्ये इनोव्हेशन व टेक्नोलॉजी महत्वाचा घटक

ओरंगाबाद येथील यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कंक यांनी इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपवर सविस्तर मार्गदर्शन करत सांगितले कि,  कि प्रत्येक क्षेत्रात विविध समस्या आहेत पण त्यावरील उपाय, म्हणजेच समस्या सोडवण्याचा दृष्टीकोन असला कि इनोव्हेशन येते कारण प्रत्येक इनोव्हेशनची सुरुवात हि समस्येने होते आणि त्याचा शेवट हा बिजनेसने होतो. म्हणजेच अंतर्प्रणरचा जो बेस आहे तो इनोव्हेशन आहे आणि या पुढे इनोव्हेशन व टेक्नोलॉजीची जे लोकं कास धरतील तेच भविष्यात यशस्वी मार्गक्रमण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच लोकांना आता सर्वच रेडिमेट हवे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून तर सर्वच क्षेत्रातील लोक गुगलवर विसंबून असतात इतकेच नव्हे तर कोणत्या आजार कोणते औषध घ्यायचे यासाठीहि आता गुगलची मदत घेतली जाते त्यामुळे आजकालच्या लोकांनी गुगलचे गुलाम न होता अभ्यास व वाचन करायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश