रायसोनी इस्टीट्यूटमध्ये “नीव” वार्षिक आनंदोत्सव दिमाखात साजरा
रायसोनीच्या रंगमंचावर रंगली कलामैफल ; अविस्मरणीय कार्यक्रमाने भारावले सहकारी रसिक
जळगाव, ता. १० : जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये सहका-यांसाठी एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अॅण्ड कल्चरल मिट म्हणजेच “नीव” वार्षिक आनंदोस्तव व क्रीडा सप्ताह जल्लोषात पार पडला. यावेळी नाटक, मिमिक्री, समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, पारंपारिक वेशभूषा, , बॉलिवूड थीम, फॅशन शो, अंताक्षरी, काव्य वाचन, क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, बॅटमिंटन, संगीत खुर्ची, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इस्टीट्यूटमधील सहका-यांना कामातून मोकळीक मिळावी तसेच कामाचा तान कमी व्हावा आणि आपल्या आतील विविध कलागुणांना चालना मिळावी, त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा व नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी या उद्देशाने क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल पाच दिवस जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी, बिजनेस मॅनेजमेंट, कनिष्ठ महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील ३०० सहकाऱ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेऊन आयुष्याची नीव पुन्हा मजबूत केली. याप्रसंगी रायसोनी समूहाचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी, मुख्याध्यापिका तेजल ओझा, ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी रायसोनी इस्टीट्यूटच्या महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पांचा आढावा घेत रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यामुळे रायसोनी इस्टीट्यूट सदैव यशोमार्गावरून वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला तसेच संचालिका प्रा. डॉ.प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात सहकारी आनंदात असतील तरच संस्थेचा विकास होईल. आनंदोत्सवासारखे सांस्कृतिक कार्यक्रम सहकाऱ्यांना येणारा ताण-तणाव दूर करण्यास साह्यभूत ठरतात. अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यातील कल्पकता व सृजनशीलतेला वाव देतात असे मत व्यक्त केले. तसेच यावेळी या चार दिवसीय आनंदोस्तवाची धुळे येथील स्वर्ण स्पर्श रिसॉर्ट सहलीने सांगता करण्यात आली. आनंदोस्तव स्पर्धेतील विजयी स्पर्धकाची अनुक्रमे निवड करून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर सहकारी, शिपाई सहकारी व स्वच्छता सहकारी यांनी रायसोनी इस्टीट्यूटच्या व्यवस्थापनाचे आभार मानले.
Comments
Post a Comment