जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २८ जानेवारीला
जळगाव, ता. १७ : जी.एच. रायसोनी
स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय
आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे २८ जानेवारीला
आयोजित करण्यात आली आहे. शिरसोली येथील जी.एच. रायसोनी इन्स्टीट्यूट अॉफ इंजीनियरींग
अँड मॅनेजमेंट या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होईल.
तालीम पद्धतीने प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषेचा वापर अनिवार्य नसेल. तसेच
यावेळी लाईट्स आणि लेव्हल्सही पुरविण्यात येणार नाही. ही फेरी पूर्णपणे तालीम
पद्धतीने होणार आहे. स्पर्धक संघांनी संहितेच्या दोन प्रती आणि डीआरएमची पावती
प्राथमिक फेरीतील प्रयोगापूर्वीच द्यायचे आहे. स्पर्धक संघाने एक तास आधी
केंद्रावर रिपोर्टींग करणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा पूर्णपणे मराठी भाषेतील
एकांकिकांसाठी आहे. जे कलावंत प्राथमिक फेरीत काम करतील तेच कलावंत अंतिम फेरीतही
असणे अनिवार्य आहे. कलावंत बदलता येणार नाही, असे आयोजकांनी कळविले आहे.
प्राथमिक फेरीत अव्वल ठरणाऱ्या तिन्ही
एकांकिकांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. अंतिम फेरी २५ व २६ फेब्रुवारीला नागपूर
येथे होणार आहे. अंतिम फेरीत ५१ हजार रुपये प्रथम, ३१ हजार रुपये द्वितीय तर २१ हजार
रुपये तृतीय पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय व्यक्तिगत व उत्तेजनार्थ पुरस्कारही
दिले जातील. प्राथमिक फेरीत प्रवेशासाठी इच्छुक महाविद्यालयांना ५०० रुपये प्रवेश
शुल्क भरायचे आहे. या स्पर्धेचा प्रवेश अर्ज तसेच नियमावली https://ghraisonikarandak.com/
या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी ७३९१०९८१३७ किंवा
७९७२७६१७८५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
Comments
Post a Comment