‘बौद्धिक संपदा’ ठरते व्यवसायात महत्त्वाची : डॉ. धुमाणे
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात "पेटंट व बौद्धिक संपदा अधिकार" या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा ; ७०० संशोधक , स्कॉलर व िध्यार्थी व उद्योजकानी नोंद व िला उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता. ३० : ' सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत नवनिर्मिती व संशोधनाचा स्पर्धात्मक लाभ घेण्यासाठी व्यावसायिक वाटचालीत ' बौद्धिक संपदा महत्त्वाची भूमिका बजावते ,' असे प्रतिपादन भारत सरकारचे माजी पेटंट अटॉर्नी जनरल डॉ. डब्लू. एम. धूमाने यांनी केले. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत बौद्धिक संपदा कक्ष तसेच महाराष्ट्र नॅशनल विधी विद्यापीठ मुंबई आणि जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.व आय.आय.पी.यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पेटंट , ट्रेडमार्क , कॉपीराइट , ट्रेडमार्क , ट्रेड सिक्रेट या विषयावर सखोल माहिती देऊन सहभागी विध्यार्थ्यांना टीप्सही दिल्या. तसेच कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्य...