रायसोनीच्या “त्रिशूल-२०२१” मध्ये विध्यार्थ्यानी बनविले टाकाऊ पासून “टिकाऊ साधने”
रायसोनी
महाविध्यालयाच्या मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाचा उपक्रम ;
विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
फोटो ओळ : ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या स्पर्धेचे परीक्षण करताना प्रा. डॉ. क्रीष्णकुमार पालीवाल, प्रा. डॉ. दिपेनकुमार रजक व प्रा. सौरभ गुप्ता
जळगाव, ता. २४ : कचऱ्याचे
वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपले घर,
परिसर, महाविध्यालय किंवा विविध भागातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण
होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून
टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या
दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो. त्यामुळे कचऱ्यात जाणाऱ्या अनेक वस्तूंचा
पुनर्वापर होऊ शकेल असा उद्देश समोर ठेवत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाने “त्रिशूल
मॅक-फेस्ट २०२१” या उपक्रमाचे ता. २२ रोजी आयोजन केले होते. या उपक्रमात ‘टाकाऊ
पासून टिकाऊ’ या स्पर्धेत हर्षल चंदानी, ललित पाटील, दिपक सैनी, भूषण खंबायत या स्पर्धकांनी मॅकेनिकल विभागाच्या वर्कशॉपमधील विविध टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ
साधने बनवत या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच यावेळी क्रीक्रेट,
चेस, कॅरम,
पोस्टर यासारख्या विविध
स्पर्धा घेण्यात आल्या. सदर उपक्रमाचे प्रा. वसीम पटेल, प्रा. अविनाश पांचाळ,
प्रा. अमोल जोशी, प्रा. जितेंद्र वडद्कर, प्रा. शिवजी कुमार तसेच प्रा. सौरभ गुप्ता
यांनी समन्वय केले. तसेच “त्रिशूल मॅक-फेस्ट २०२१” या उपक्रमाचे यशस्वीरीत्या
आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, प्रा. डॉ. क्रीष्ण कुमार पालीवाल, प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment