संविधान दिनानिमित्ताने रायसोनी महाविध्यालयात संविधान उद्देशिकेचे भव्य सामुहिक वाचन
जळगाव, ता.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयात भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रायसोनी कँपस येथे २६ नोव्हेंबर रोजी झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष श्री. अविनाशजी रायसोनी होते. या वेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी संविधान दिनाचे महत्व उपस्थित विध्यार्थ्यांसमोर विशद केले. तसेच इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन प्रा. राजकुमार कांकरिया यांनी करून घेतले. इस्टीट्यूटच्या विध्यार्थ्यांसह प्रा. तन्मय भाले, प्रा. ज्योती जाखेटे, विभागप्रमुख प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. गौरव जैन, प्रा. डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. भूषण राठी, प्रा. विनोद महाजन, प्रा. राहुल त्रिवेदी व इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment