रायसोनी महाविद्यालयात सायबर सेक्युरिटी व ब्लॉक चेन टेक्नोलॉजीवर कार्यशाळा

पाच दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन 

 


 

जळगाव, ता. २४ : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र व विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्सच्या अंतर्गत सायबर सेक्युरिटी व ब्लॉक चेन टेक्नोलॉजी या विषयावर पाच दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत अकॅडमिक, इंडस्ट्री व रिसर्च या क्षेत्रांतील आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सायबर क्राईम, आयटी अॅक्ट, सायबर नियम अॅप्लिकेशन ऑफ मशीन लर्निग, सायबर सेक्युरिटी, ब्लॉक चेन टेक्नोलॉजी या विविध विषयावर विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. हिरालाल सोळुंखे, प्रा. हर्षद पाटील यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागाचे विध्यार्थी  शाहनवाज सय्यद, श्रुती बडगुजर, मुकुल झोपे आणि प्रांजल चिरमाडे यांनी केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, प्रा.डॉ. क्रिष्ण कुमार पालीवाल यांनी कौतुक केले   

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश